औरंगाबाद
जिल्ह्यातील करोना मृतांचा आकडा १२५० वर
घाटी रुग्णालयात आतापर्यंत ९७६ बाधितांचा मृत्यू
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
औरंगाबाद
:-केवळ चार
तासांत चार करोनाबाधितांचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला असून, करोना बळींचा
आकडा १२५० पर्यंत पोहोचला आहे. सर्व मृत हे औरंगाबाद जिल्ह्यातील असल्याचेही
स्पष्ट झाले आहे.
औरंगाबाद
शहरातील संजयनगर, बायजीपुरा भागातील ३८
वर्षीय बाधित पुरुष रुग्णाला गुरुवारी (१८ फेब्रुवारी) शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) दाखल करण्यात आले होते व त्याच दिवशी म्हणजे
गुरुवारी रात्री दहा वाजता रुग्णाचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. जिल्ह्यातील
पैठण तालुक्यातील पाचोड येथील ७५ वर्षीय बाधित महिला रुग्णावर १२ फेब्रुवारीपासून
उपचार सुरू असताना रुग्णाचा गुरुवारी रात्री ११ वाजता मृत्यू झाला.
शहरातील
चिकलठाणा परिसरातील सविता मंगल कार्यालय परिसरातील ६५ वर्षीय बाधित पुरुष रुग्णावर
सहा फेब्रुवारीपासून उपचार सुरू असताना रुग्णाचा गुरुवारी मध्यरात्री १२ वाजून पाच
मिनिटांनी मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यातील करमाड तालुक्यातील वरुड काझी परिसरातील
५२ वर्षीय बाधित पुरुष रुग्णावर ४ फेब्रुवारीपासून उपचार सुरू असताना रुग्णाचा
गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीमध्ये ९७६
बाधितांचा, तर औरंगाबाद जिल्ह्यात एकूण १२५०
बाधितांचा मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने कळवले आहे.
0 टिप्पण्या