मनपा अधिकारी पैठणकर लाच घेताना चतुर्भुज ..



लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर  :-  अहमदनगर महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागतील आरोग्य अधिकारी नरसिंह सर्वोत्तमराव पैठणकर (वय - 47 ) याला अडीच लाखाची लाच घेताना  लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. सावेडीतील कचरा डेपो येथील कार्यालयात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. 



याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांची अहमदनगर महानगरपालिका येथे मृत जनावरांचे दाहीनीचा प्रोजक्ट असुन त्या प्रोजेक्ट संदर्भात NEERI ने त्रुटी काढल्या आहेत असे सांगून त्या दूर करून तक्रारदार यांचे राहीलेले बील काढण्यासाठी तक्रारदार यांना 5,00,000/- रू सांगुन  दि. 11 फेब्रुवारी 2021 रोजी पंचासमक्ष तडजोड अंती 2,50,000/- रू.ची लाचेची मागणी करून ती लाचेची रक्कम दि. 17 फेब्रुवारी 2021 रोजी सावेडी कचरा डेपो अहमदनगर येथे  पंच  साक्षीदारांसमक्ष  स्विकारली. 


लाचलुचपत नाशिक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक नाशिक परिक्षेत्राचे निलेश सोनवणे, पोलिस उपअधीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक मृदुल एम.नाईक, सापळा पथक मोरे, गोसावी, कुशारे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या