.लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
जेजुरी : खा.शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला 50 वर्ष उलटून गेली आहेत. यादरम्यान पवार यांच्यावर अनेकदा सणसणाटी आरोप झाले तर कधी विखारी टीकाही झाली. मात्र त्याचा उल्लेखच न करता समोरच्या व्यक्तीला अनुल्लेखाने मारणे, हेच ते पवारांचे हुकमी अस्त्र. जेजुरीत शनिवारी झालेल्या कार्यक्रमातही शरद पवार यांनी हेच अस्त्र वापरत गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख करत ' बायकॉट' करून टाकलं .
येथील गडावर उभारण्यात आलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र या कार्यक्रमाआधी मोठे राजकीय नाट्य घडले आणि वातावरणही तापले. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाआधीच या परिसरात दाखल होत गनिमी काव्यानं पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला.
नियोजित कार्यक्रमाआधी गोंधळ घालणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्यावर खा. शरद पवार काय बोलणार ? याची राज्यभर उत्सुकता होती. मात्र शरद पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर 'हल्ला' करून त्यांच महत्व उगाच न वाढविता नेहमीच्या पद्धतीने नामोल्लेख टाळत ते आपल्या लेखी नसल्याचं दाखवून दिलं .
खा.शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्द ही सध्या राजकारणात असलेल्यांच्या वया ईतकी आहे . यादरम्यान पवार यांच्यावर अनेकदा सणसणाटी आरोप झाले तर कधी विखारी टीकाही झाली. नेमकं उत्तर कोणाला व काय द्यायचं हे त्यांना अचूक हेरता येत . अनेक वेळा या सगळ्यांवर पलटवार करण्याऐवजी शरद पवार एकच शस्त्र वापरत राहिले. ते म्हणजे त्या विषयाच्या गावालाच जायचं नाही . सामोरच्याचा उल्लेखच न करता त्याला अनुल्लेखाने मारणे, हेच ते पवारांचे हुकमी अस्त्र.
आ.पडळकरांची राजकीय दिशा.अन् एकच लक्ष्य !
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले गोपीचंद पडळकर हे वारंवार शरद पवार यांच्यावर आक्रमक टीका करत आहेत. 'शरद पवार हे महाराष्ट्राला झालेले कोरोना आहेत...ते जातीयवादी आणि भ्रष्टाचारी आहेत,' अशी जहरी टीका असो वा त्यांच्या नियोजित कार्यक्रमाआधी घातलेला गोंधळ. गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपली नवी राजकीय दिशा स्पष्ट केली आहे. शरद पवार हेच आपलं लक्ष्य असणार, हे गोपीचंद पडळकर यांनी अनेकदा आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. दरम्यान मोदिंसारखे बलाढ्य नेत्यांना दाद न देणारे पवार साहेब पडळकरांना कोणता डाव कधी टाकतील याचा त्यांनी केवळ कल्पना अन् अंदाज च बांधलेला बरा..
0 टिप्पण्या