भगवंतांचे नामस्मरण हे जीवनाचे उद्दिष्ट हवे - हभप माऊली गायकवाड
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
जगामध्ये कोणताही जीव जेव्हा जन्मास येतो, तेव्हा तो अगदी असमर्थ असहाय्य असतो, पहिला गुरु आई, दुसरा गुरु वडिल असतात तिसरे गुरु आपण भगवंताच्या रुपात पाहतो. भगवंतांचे नामस्मरण हे जीवनाचे उद्दिष्ट ठेवले कि प्रापंचिक प्रश्नांबरोबरच परमार्थातील समस्या आपोआप सुटतात, असे प्रतिपादन हभप माऊली महाराज गायकवाड यांनी केले.
दरवर्षी वडाळा ते पंढरपुर पायी दिंडी सोहळ्यासाठी वारकरी खांद्यावर पालखी नेत. आता लोकवर्गणीतून तयार करण्यात आलेल्या संत सेना महाराज रथाचे लोकार्पण हभप माऊली गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास अरुण महाराज गायकवाड, राम महाराज गायकवाड, शौकत इनामदार, नामदेव गवळी, विलास कोरडे, अशोक भागवत, माधव कदम, भागचंद बिडवे, बाबासाहेब शिंदे, तात्यासाहेब शिंदे, दिलीप गवळी, आदिंसह भक्तगण उपस्थित होते.
हभप गायकवाड पुढे म्हणाले, प्रपंच हा मोहात अडकवतो तर परमार्थ माया, मोह, द्वेष यामधून मुक्त करत असतो. वडाळा-पंढरपूर संत सेना महाराज यांची दिंडी जात असते. यावर्षी रथ तयार करण्यासाठी भाविकांनी योगदान दिल्याने आज हा रथ लोकार्पण होत आहे, ही सेवा पांडूरंग चरणी लागेल, असे सांगितले. प्रास्तविकात शाम औटी यांनी दिंडीबाबत सविस्तर माहिती दिली. पालखी नेण्यासाठी रथ तयार करण्याचा मानस होता, तो आज पूर्ण झाला. यंदा तरी पंढरपुरला दिंडी जावो, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या लोकार्पण सोहळ्यास बाळासाहेब भुजबळ, राजेश सटाणकर, अनिल निकम, जगन्नाथ औटी, गणेश औटी, अशोक औटी, प्रशांत पाटील, अंकुश चत्तर, नारायण जोशी, राजू कदम, आबा चव्हाण, रवि चोथे आदिंसह पद्मानगर येथील रहिवासी उपस्थित होते.
0 टिप्पण्या