लोकनेता न्यूज
करंजी:-पाथर्डी
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मारल्या जाणाऱ्या आठरेकौडगाव ,निंबोडी, त्रिभुवनवाडी
ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक मंगल राजेंद्र म्हस्के
तर उपसरपंचपदी अंबादास मोहन कारखेले यांची निवड करण्यात आली आहे. या निवडी प्रसंगी
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य विकास उदमले, सोनाली कारखेले, गीता कारखेले, पारूबाई
दोडके,जनार्धन बर्डे उपस्थित होते.
तीन गावचा विस्तार असलेल्या कौडगावच्या सरपंचपदी
नेमकी कोणाची वर्णी लागणार याची मोठी उस्तुकता अनेकांना लागून राहिली होती. यामध्ये
शिवसेनेचे तालुका संघटक राजेंद्र म्हस्के यांच्या सौभाग्यवती व शिवसेनेच्या महिला जिल्हा
संघटक मंगल म्हस्के यांनी बाजी मारली आहे. सरपंच उपसरपंच पदाच्या निवडीनंतर गावचे ज्येष्ठनेते
लक्ष्मण कारखेले, अण्णासाहेब भापसे, अरुण आठरे, अविनाश कारखेले, ज्ञानेश्वर रांधवणे,
भवानीसिंह चव्हाण, गणेश कारखेले, संभाजी कारखेले, शिवाजी कारखेले, सुरेश लवांडे ,म्हातारदेव
कोरडे मनोज कारखेले, राहुल कारखेले, प्रसाद आव्हाड, संतोष आठरे, ज्योतिबा आठरे, पृथ्वीराज
आठरे बाजीराव भापसे, संभाजी वाघ, अशोक म्हस्के, गणेश म्हस्के, किशोर म्हस्के, पप्पू
शिंदे, सुभाष जाधव, हरिभाऊ कारखेले, बाबासाहेब कारखेले, अविनाश कारखेले, भोलेनाथ म्हस्के,
भास्कर शेरकर, संजय कारखेले, दिलीप कारखेले, अशोक कारखेले यांच्यासह अनेकांनी गुलाल
उधळत या निवडीचे स्वागत केले. मंगल म्हस्के यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल शिवसेनेचे
जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी देखील म्हस्के यांचे अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या