लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
करंजी/ नगर:- नगर पाथर्डी मार्गे जात
असलेल्या कल्याण-विशाखापट्टणम सारख्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या चार
वर्षापासून रखडले असून या अर्धवट कामामुळे दीडशेहून अधिक प्रवाशांचा हकनाक बळी
गेला असताना या महामार्गाचे काम अर्धवट ठेवून नगर पुणे रस्ता दोन मजली व सोळा पदरी
करण्याचा प्रयत्न
केंद्रीय दळणवळण मंत्र्यांकडून होत असेल तर अगोदर अर्धवट राहिलेल्या महामार्गाचे काम पूर्ण करा अन्यथा नगर-पुणे
महामार्गाच्या सोळा पदरी होणाऱ्या कामाचे भूमिपूजन होऊ देणार नाही असा इशारा बहुजन
क्रांती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सतीश पालवे यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना पत्राद्वारे दिला आहे.
याबाबत ॲड. पालवे यांनी
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नगर -पाथर्डी रस्त्यावर अर्धवट कामामुळे अनेकांचा
जीव गेला आहे ,अनेकजन कायमस्वरूपी अपंग झाले आहेत
.रस्त्याच्या धुळीने आणि खड्ड्याने महामार्गालगत राहणाऱ्या नागरिकांची आजारी
पडण्याची संख्या वाढली आहे अनेक आंदोलने ,मोर्चे काढण्यात
आले खासदार ,आमदार यांच्याकडे याबाबत पाठपुरावा नागरिकांनी
केला. परंतु या रस्त्याचे काम काही पुढं जात नाही . या रस्त्याच्या अर्धवट
कामामुळे नागरिक प्रवासी परेशान झाले असताना नगर ते पुणे सोळा पदरी आणि डबल मजली
रस्त्याची घोषणा केली आहे.
एकदा या महामार्गाच्या
रस्त्याची अधिकाऱ्यांकडे जबाबदारी आहे त्यांच्याकडून पाथर्डी -नगर रस्त्याच्या
कामाची माहिती घ्या ,काम अर्धवट का आहे कधीपासून आहे त्याचा
दर्जा काय याची विचारणा करा आणि मग नवीन रास्ता सोळा पदरी नाही तर बत्तीस पदरी करा
आमचा त्याबाबत दुमत नाही परंतु अगोदर रखडलेले महामार्गाचे कामे पूर्ण करा पाथर्डी
-नगर रस्ता पूर्ण करण्याचे आदेश द्या अन्यथा पुणे -नगर
रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आम्ही होऊ देणार नाहीत असा इशारा ॲड. पालवे
यांनी दिला आहे.
धोकादायक वळण जैसे थेच
नगर पाथर्डी रस्त्यावरील अनेक धोकादायक वळण
जैसे थेच ठेवून या महामार्गाचे काम उरकते घेण्याचा ठेकेदार व अधिकाऱ्यांचा प्रयत्न
आहे ही धोकादायक वळण दुरुस्त केली नाही तर ती सर्वांसाठीच जीवघेणी ठरतील याकडेही ॲड.
पालवे यांनी लक्ष वेधले आहे.
0 टिप्पण्या