Ticker

6/Breaking/ticker-posts

बांधकाम परवान्‍यासाठी नागरिकांना तात्‍काळ परवानगी द्या ! -महापौर

 


लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

महापौरांनी दिले विकास कामाला गती देण्‍याचे आदेश.

 नगर : - मनपाचे उत्‍पन्‍न वाढी बरोबरच शहराच्‍या वैभवात भर पडण्‍यासाठी नेहरू मार्केट, प्रोफेसर कॉलनी चौक व सावेडी एनसीसी कार्यालयाच्‍या जागेवर शॉपिंग कॉप्‍लेक्‍स मनपाच्‍या माध्‍यमातून उभारण्‍यात येणार आहे.  यासाठी नगर रचना विभाग व बांधकाम विभाग यांना प्रस्‍ताव तयार करण्‍याच्‍या सुचना दिल्‍या आहेत. तसेच बांधकाम परवान्‍यासाठी नागरिकांना तात्‍काळ परवानगी दयावी फाईलींचा प्रवास कमीत कमी दिवसात करून मंजूरी दयावी, असे आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिले .

विविध विकास कामांचा आढावा महापालिकेच्या बैठकीत घेण्यात आला . पुढे ते म्हणाले, प्रत्‍येक अधिकारी यांनी आपआपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी. तसेच शहराला पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होण्‍यासाठी अमृत पाणी योजनेच्‍या पाईप लाईन टाकण्‍याच्‍या कामास गती दिली आहे. अनेक अडथळे दूर झाले असून लवकरच शहराला पूर्ण दाबाने पाणी मिळणार आहे. तसेच फेज-2 पाणी योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. शासनाच्‍या विविध योजनेची कामे शहरात सुरू असून लवकरच ही कामे मार्गी लागावी यासाठी प्रशासनाने काम करावे. शहरामध्‍ये मनपा बजेट अंतर्गत विविध विकास कामे प्रभागामध्‍ये मंजूर आहेत. तसेच मनपा फंडातील कामे मंजूर आहेत. याकामांच्‍या निविदा प्रक्रियेला विलंब होत असल्‍याने अनेक रस्‍त्‍यांची कामे प्रलंबित आहेत. यासाठी निविदे प्रक्रियेवर अनेक अधिकारी यांच्‍या सहया घ्‍याव्‍या लागत आहेत त्‍या कमी करण्‍यासाठी उपाय योजना कराव्‍यात व बांधकाम विभागालाच मंजूरीचा अधिकार दयावा. छाननी प्रक्रियेतही एखादा अधिकारी सुट्टीवर असल्‍यास छाननी प्रक्रियेला विलंब होत आहे. दुस-या दिवशी छाननी प्रक्रिया पार पाडावी. असे आदेश  वाकळे यांनी दिले.

महापौर म्‍हणाले की, गंगा उदयान शेजारील रस्‍ता हा औरंगाबाद रस्‍त्‍याला जोडणारा रस्‍ता आहे. या रस्‍त्‍याचे काम 90 टक्‍के पूर्ण झाले असून काही तांत्रिक अडचणीमुळे काम रखडले आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर या रस्‍त्‍याचे काम पूर्ण करावे. तारकपूर रोड ते विभागीय एस टी डेपो ला जोडणा-या रस्‍त्‍यावरील अतिक्रमण हटवून रस्‍त्‍याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे. सीना नदी लगतचा डीपी रस्‍ता बालिकाश्रम रोड पंपीग स्‍टेशन ते कल्‍याण रोडला जोडणारा हा नविन रस्‍ता मनपा निर्माण करणार आहे. नगररचना विभागाने तात्‍काळ कार्यवाही सुरू करावी. जेणे करून या रस्‍त्‍यामुळे शहर विकासाला चालना मिळणार आहे असे ते म्‍हणाले.

मनपा नगररचना विभाग, बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग, अमृत पाणी योजना ,फेज-2 पाणी योजनेच्‍या विभागाच्‍या बैठकीत वाकळे यांनी अधिकाऱ्यांना सुचना केल्‍या. यावेळी उपायुक्‍त डॉ.श्री.प्रदिप पठारे, मा.श्री.संजय ढोणे, मा.श्री.निखील वारे, मा.श्री.सतिष शिंदे, नगररचना विभाग प्रमुख श्री.राम चारठाणकर, शहर अभियंता श्री.सुरेश इथापे पाणी पुरवठा विभाग प्रमुख श्री.रोहिदास सातपुते याविभागाचे अभियंता ठेकेदार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या