Ticker

6/Breaking/ticker-posts

खा. विखे पाटलांच्या पाठपुराव्याला यश; कर्जतसाठी 110 घरकुलांस मंजुरी

 लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

अहमदनगर:- गोरगरिबांच्या घरकुलाचे स्वप्न साकार करणार्‍या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यासाठी 110 घरकुलांच्या प्रस्तावास केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. या घरकुलांच्या पहिल्या हप्त्यापोटी केंद्र सरकारच्या हिश्‍श्‍याचे 40 टक्क्यांच्या निधी देण्यात आल्याची माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली.

 

 याबाबत बोलताना खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की केंद्र सरकारच्या गृहनिर्माण विभागाच्या समितीची बैठक नुकतीच नवी दिल्ली येथे झाली आहे. बैठकीमध्ये विविध राज्यांचे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत चे प्रस्ताव प्राप्त झाले असून महाराष्ट्रातून अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुका साठी सुमारे एकशे दहा लाभार्थींसाठी घरकुलांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यामध्ये मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी 31 घरकुले , इतर मागासवर्गीयांसाठी 14 घरकुले आणि जनरल कॅटेगरी साठी 65 घरकुले मंजूर झाले असून या घरकुलांची अंदाजित किंमत 622 लाख रुपये असून यापैकी केंद्र सरकारचा वाटा 1 65 लाख रुपयांचा असून पैकी पहिल्या हप्त्यापोटी केंद्र सरकारच्या वतीने चाळीस टक्के रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

 

कर्जत नगरपालिकेने मागील वर्षी 280 घरकुलांचे प्रस्ताव सादर केले होते. नगराध्यक्ष प्रतिभाताई भैलुमे , उपनगराध्यक्ष नामदेव राऊत आणि नगरसेवकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कर्जत नगरपालिकेने यापूर्वीही सुमारे 500 पेक्षा जास्त घरकुलांचे डीपीआर पाठवले होते व व ते मंजूर झाले आहेत . आतासुद्धा नवीन 110 घरकुलांच्या डीपी आर साठी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न केले गेल्यामुळे केंद्रीय समितीने मंजुरी दिली आहे. खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी डीपीआर मंजूर होण्यासाठी गृहनिर्माण मंत्रालयाकडे प्रयत्न केल्यामुळे गोरगरिबांच्या घरकुलांचे स्वप्न साकार होत आहे . 

 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने प्रत्येक गोरगरिबाला स्वतःच्या हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला असून लवकरच सर्व गोरगरीबांचे घरकुलाचे स्वप्न साकार होईल असा विश्वास आपल्याला वाटतो असे डॉक्टर विखे पाटील म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या