Ticker

6/Breaking/ticker-posts

इंग्लंडचा धुव्वा : टीम इंडियाचा दणदणीत विजय..! मालिकेत 1-1 बरोबरी



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  

चेन्नई :- इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडचा 317 धावांनी पराभव केला. भारताने चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. आर अश्विन या सामन्याचा हिरो ठरला. दुसऱ्या डावात टीम इंडियाने इंग्लंडसमोर 482 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र इंग्लंडचा डाव भारतीय गोलंदाजांनी 164 धावांवर गुंडाळला. पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाने 143 धावा केल्या होत्या. आजच्या विजयानंतर टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याची आशा भारताने कायम ठेवली आहे.


दुसर्‍या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने इंग्लंडला आर अश्विनच्या शतकाच्या आणि 8 विकेट्सच्या जोरावर पराभूत केलं. भारताच्या शानदार गोलंदाजीसमोर 482 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ केवळ 164 धावांतच आटोपला. भारताकडून पदार्पण करणाऱ्या अक्षर पटेलने 60 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. याशिवाय आर अश्विन तीन विकेट घेण्यास यशस्वी झाला आणि कुलदीप यादवने दोन विकेट घेतल्या. इंग्लंडकडून दुसर्‍या डावात मोईन अलीने 18 चेंडूत तीन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 43 धावा केल्या. कर्णधार जो रूटने 92 चेंडूत 33 धावा केल्या. डॅनियल लॉरेन्स 26, रोरी बर्न्सने 25, ओली पोपने 12 धावा केल्या.

पहिल्या दिवसापासून टीम इंडियाची आघाडी

काल तिसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 53 धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या. चौथ्या दिवशी इंग्लंड दोन सेशनही खेळू शकला नाही. लंच ब्रेक नंतर थोड्याच वेळात रुट आऊट झाला. त्यानंतर इंग्लंडचा डाव लंच ब्रेकनंतर 20 मिनिटातचं संपुष्टात आला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताने 6 विकेट्स गमावत 300 धावा केल्या. पहिल्या डावात रोहित शर्माने 161 धावांची शतकी खेळी केली. भारताचा पहिला डाव 329 धावांवर संपुष्टात आला. तर इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 144 धावाच करु शकला आणि टीम इंडियाला 195 धावांडी आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात अश्विनच्या 106 धावांच्या जोरावर भारताने दुसर्‍या डावात 286 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 482 धावांचे आव्हान ठेवलं. मात्र इंग्लंडचा संघ 164 धावाच करु शकला आणि भारताने 317 धावांनी विजय मिळवला.

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या