लोकनेता न्यूज ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शेवगाव :- ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडीत आज झालेल्या २२ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडीत १३ बिनविरोध तर ८ ग्रामपंचायत
सरपंच, उपसरपंच पदासाठी निवडणुका झाल्या आणी सोनेसागंवी येथे एकही अर्ज दाखल न झाल्याने
येथील निवड स्थगित झाली आहे.
बुधवार
दि. १0 रोजी २२ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडी झाल्या.यात १४ ग्रामपंचायत सरपंचपदासाठी
महिलांना संधी मिळाली असून सोनेसांगवी येथील निवडीत एकाही सदस्यांनी आपला अर्ज दाखल
न केल्याने हि निवड स्थगित करण्यात आली. तर नविन दहिफळ ग्रामपंचायत सरपंचपद अनुसुचीत
जमाती महिला आरक्षीत होते मात्र येथे हा सदस्य नसल्याने ते पद रिक्त राहिले तर राक्षी
येथे फक्त उपसरपंच पदासाठी निवडणुक झाली.
२२ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच
निवडी पैकी दादेगाव, हातगाव, कांबी, लखमापुरी, निंबेनांदुर, राक्षी ( उपसरपंच) शेकटे
बु, ताजनापुर या ग्रामपंचायतीत पदासाठी निवडणुका झाल्या.
अंतरवली खु. शे. : तुकाराम
कसाळ, रामेश्वर कसाळ.
भातकुडगाव : सरस्वती वाघमोडे , विठ्ठल फटांगरे
चेडेचांदगाव : कोमल कणसे, उषा माने.
दादेगाव : कुसुम दारकुंडे, शंकर दारकुंडे.
ढोरजळगाव शे. : रागिणी लांडे, चंद्रकला बांगर.
हातगाव : अरुण मातंग, नंदाबाई बर्गे.
कांबी : नितीश पारनेरे, सुनिल रजपुत.
लखमापुरी : मनीषा गावंडे, अलका थोरे.
मजलेशहर : विद्या लोढे, गायत्री लोढे.
मळेगाव शे. : सुरेश घोरपडे, आशाबाई निकम.
नविन दहिफळ :
अनु.जाती महिला उमेदवार
नसल्याने रिक्त, उपसरपंच कचरू इसारवाडे.
राक्षी : रंजना कातकडे, भारत कातकडे.
शेकटे बु. : छाया गरड, ज्योती फाटे.
शिंगोरी : भाग्यश्री पोपळघट, रामराव चेमटे.
सोनेसांगवी : एकही अर्ज दाखल नाही.( रिक्त )
सोनविहीर : इंदुबाई काकडे, ज्ञानदेव विखे.
ताजनापुर : वैशाली गायकवाड, नारायण बलिया.
तळणी : चंद्रकला सातपुते, सुनिता तुपविहिरे.
ठाकुर निमगाव : सुनिता कातकडे, नवनाथ बळी.
ठाकूर पिंपळगाव : संजय खेडकर, रोहिणी गोयकर.
वरखेड : उषाबाई तेलोरे, विकास शिरसाठ.
0 टिप्पण्या