मुंबई :्टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या Jio Phone साठी असलेले चार स्वस्त प्लॅन्स बंद केले आहेत. कंपनीने 99 रुपये, 153 रुपये, 297 रुपये आणि 594 रुपयांचे चार रिचार्ज प्लॅन बंद केलेत.
Jio ने बंद केलेल्या 99 रुपये, 297 रुपये आणि 594 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना 0.5 जीबी डेटा मिळायचा. या तिन्ही प्लॅन्सची वैधता अनुक्रमे 28 दिवस, 84 दिवस आणि 168 दिवस होती. तिन्ही प्लॅन्समध्ये अनलिमिटेड जिओ टू जिओ व्हॉइस कॉलिंह आणि नॉन-जिओ कॉलिंग मिनिटे मिळायची. तर, 153 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1.5 जीबी डेटा मिळायचा. तसेच अनलिमिटेड जिओ टू जिओ व्हॉइस कॉलिंग आणि नॉन-जिओ कॉलिंग मिनिटांसह 100 एसएमएस प्रतिदिन मिळायचे. कंपनीने अलिकडेच अनलिमिटेड कॉलिंगची सेवा सुरू केल्यामुळे हे प्लॅन बंद केल्याचं सांगितलं जात आहे.
पर्याय काय?
99 रुपये, 153 रुपये, 297 रुपये आणि 594 रुपयांचे चार Jio Phone रिचार्ज प्लॅन बंद केले असले तरी जिओफोन युजर्ससाठी कंपनीकडे 75 रुपये, 125 रुपये, 155 रुपये आणि 185 रुपयांचे प्लॅन उपलब्ध आहेत.
0 टिप्पण्या