ऑनलाईन न्यूज नेटवर्क
मुंबई : आर्थिक वर्ष 2021-22
यावर्षातील अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आपल्या देशाच्या
अर्थव्यवस्थेसंदर्भात एक चांगली बातमी समोर आली आहे. जानेवारीमध्ये 1.20 लाख कोटी रुपयांचा जीएसटी गोळा झाला आहे. हा आकडा गुड्स अॅन्ड सर्विसेस
टॅक्स म्हणजेच, जीएसटी लागू झाल्यानंतर सर्वाधिक आहे. गेल्या
महिन्यामध्ये 1.15 लाख कोटी रुपये इतका जीएसटी गोळा झाला
होता. तर गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेत 10 हजार कोटी
रुपयांचा अधिक महसूल गोळा झाला आहे.
अर्थमंत्रालयाच्या वतीने
जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 31 जानेवारी रोजी
संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 1,19,847 कोटी
रुपये इतका जीएसटी सरकारी तिजोरीत गोळा झाला आहे. यापैकी CGST 21,923 कोटी रुपये इतका आहे. तर SGST 29,014 कोटी रुपये
इतका, तर IGST 60,288 कोटी रुपये इतका
आहे. डिसेंबरपासून 21 जानेवारीपर्यंत 90 लाख GSTR-3B रिटर्न दाखल करण्यात आला आहे. सलग गेल्या चार महिन्यांपासून जीएसटी कलेक्शन 1
लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत पुन्हा तेजी
मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. बनावट बिलिंग विरोधात ठेवण्यात आलेली पाळत,
जीएसटी, इनकम टॅक्स आणि कस्टम आयटी सिस्टममधून
मिळालेल्या डेटाचं डीप अॅनालिटिक्स आणि टॅक्स प्रशासन प्रभावी झाल्यामुळेही टॅक्स
कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे.
जीएसटी कलेक्शन ?
महिना |
जीएसटी
कलेक्शन कोट्यवधी रुपयांमध्ये |
जानेवारी 2020 |
110000 |
फेब्रुवारी 2020 |
105366 |
मार्च 2020 |
97,597 |
एप्रिल 2020 |
32,294 |
मे 2020 |
62,009 |
जून 2020 |
90,917 |
जुलै 2020 |
87,422 |
ऑगस्त 2020 |
86,449 |
सप्टेंबर 2020 |
95,480 |
ऑक्टोबर 2020 |
1,05,155 |
नोव्हेंबर 2020 |
1,04,963 |
डिसेंबर 2020 |
1,15,174 |
जानेवारी 2021 |
1,19,847 |
दरम्यान, आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 12 पैकी 8 महिन्यांमध्ये जीएसटीचा महसूल एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होता. दरम्यान, चालू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जीएसटी महसूलावर परिणाम झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एप्रिलमध्ये 32,172 कोटी रुपये गोळा झाले असून हा अत्यंत कमी गोळा झालेला जीएसची महसूल आहे. दरम्यान, लॉकडाऊनमध्येही दिलासा मिळाल्याने यात सुधारणा झाली.
0 टिप्पण्या