लोकनेता न्यूज
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
पंढरीपुल :- राज्याचे
सामाजिक न्याय विभागाचे मंत्री ना.धनंजय मुंडे हे शनिवारी नगर जिल्ह्याच्या
दौऱ्यावर आले असताना पांढरीपुल येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथे संत वामनभाऊ-संत भगवान
बाबा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सप्ताह सोहळ्यात पद्मश्री
डॉ.तात्याराव लहाने यांना समाजभूषण पुरस्काराचे वितरण ना.मुंडेंच्या हस्ते होणार
होते.या कार्यक्रमासाठी जाताना त्यांनी पांढरीपुल येथे पाथर्डी पंचायत समितीचे
माजी सभापती संभाजीराव पालवे,कोल्हार सेवा संस्थेचे अध्यक्ष
राणाप्रताप पालवे,बाजार समितीचे माजी उपसभापती भरतराव पालवे
व हॉटेल व्यावसायिक जनताराम पालवे या कुटुंबाच्या घरी सदिच्छा भेट दिली.
यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत मंत्री मुंडे यांच्यावर जेसीबी मधून
फुलांचा वर्षाव व क्रेनच्या साहाय्याने पुष्पहार घालून मोठ्या उत्साहात स्वागत
केले.यावेळी प्रचंड मोठा जनसमुदाय जमा झाल्याने मंत्री मुंडे यांनी सत्कार
स्विकारुन लगेच पुढे रवाना झाले ॰
यावेळी भगवान सेवा संघाचे जिल्ह्याध्यक्ष आनंद लहामगे,सातवडचे सरपंच राजेंद्र पाठक,राघोहिवरे चे सरपंच
भाऊसाहेब दहिफळे,अशोक टेमकर, तुळशीदास
शिंदे,सुखदेव गिते, संभाजी गिते,सुरेश पवार,अनिल रांधवणे, गणेश
पालवे,राजेंद्र म्हस्के,मचे सर,महेश लवांडे,सुधाकर वांढेकर,भारत
वांढेकर,त्रिंबक पालवे,भगवान फुलमाळी,
किरण खेडकर,राजेंद्र ढाकणे,मल्हारी घुले,संजय बडे व किसन आव्हाड यांच्यासह अनेक
कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या