Ticker

6/Breaking/ticker-posts

अबब ..पोलिसांचीच बुलेट चोरीला !

 

नेवासा फाटा :- अहमदनगर येथील  जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात बिनतारी संदेश कक्षात नेमणूकीस असलेले पोलिस हवालदार संजूबाबा किसन गायकवाड यांची रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट   ( क्रमांक एम.जे.एफ.२६९७) नेवासे फाटा येथील सुयोग मंगल कार्यालयासमोरील त्यांच्या रहात्या घरासमोरुन चोरी झाली आहे. याबाबत नेवासे पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस हवालदाराच्याच बुलेटची चोरी झाल्यामुळे 'सद् रक्षणाय.. खलनिग्रहणाय... या बिद्र वाक्याला अन पोलिसांनाच  चोरांनी आव्हान दिले आहे.

  याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,संजय किसन गायकवाड (वय ४६) रा.सुयोग मंगल कार्यालयासमोर नेवासा फाटा यांच्या राहत्या घरासमोरुन गुरुवार (दि.२१ जानेवारी) रोजी पहाटेच्या सुमारास संजय गायकवाड हे पोलिस अधिक्षक कार्यालयामध्ये बिनतारी संदेश कक्षात नेमणूकीस असतांना ते ड्युटीवर असतांना त्यांच्या बुलेटची अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन पोबारा केला या घटनेची माहीती पोलिस हवालदार गायकवाड यांना झाल्यानंतर अनेकांकडे बुलेटची चौकशी केली माञ ती मिळून न आल्यामुळे अखेर पोलिसाचीच बुलेट चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्याची  केविलवानी वेळ पोलिसावर आली आहे.  सर्व सामन्यांच्या घरफोडया गाड्या,चोरीला जाने नित्याचे झाले, परंतु आता पोलिसांनाही चोरांपूढे हतबल होण्याची वेळ आली असल्याची खमंग चर्चा झडत आहे.

 

  दरम्यान येथील युवा नेते  अनिल ताके यांची  देखील शनिवारी रात्री मोटारसायकल चोरीला गेली आहे. मात्र तपास लागला   नाही. सध्या पोलिस ठाण्याला  पोलिस निरीक्षक  नाही,  त्यामुळे शहरात चो-या वाढल्या आहेत.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या