Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा बँकेसाठी खा. विखेंच्या सूचनेनुसार अभय आव्हाड यांचा अर्ज दाखल

 


पाथर्डी:- माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सूचनेनुसार भाजपकडून भटक्या विमुक्त जाती जमाती संवर्गातून शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली भाजपकडून हा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर बांच्याकडे देण्यात आला. यावेळी मधुकर महाजन, माजी उपनगराध्यक्ष बंडूशेठ बोरुडे, अजय रक्ताटे, सुनील साखरे, दत्ता सोनटके आदी उपस्थित होते.

 पहिल्यांदाच भाजप या पक्षाकडून दोन जण उमेदवार असणार आहेत.विद्यमान आमदार मोनिका राजाळे ह्या सध्या जिल्हा बँकेत संचालक पदावर आहे. राजळे यांनी सेवा सोसायटी मतदार संघातून संचालक पदावर विराजमान झाल्या होत्या. अभय आव्हाड हे माजी आमदार स्वतंत्रसेनानी स्व बाबूजी आव्हाड यांचे सुपुत्र असून त्यांचा पाथर्डी तालुक्यात चांगला जनसंपर्क आहे.शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामामुळे त्यांना मानणारा वर्ग आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत रंग भरायला सुरुवात झाली असुन निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. जिल्ह्यातील अनेक दिग्गज या निवडणुकीत उतरले असुन मंत्री बाळासाहेब थोरात व माजी मंत्री राधाकृष्ण विखे व माजी मंत्री कर्डिले यांच्या भोवती बँकचे राजकारण फिरत आहे. आव्हाड यांची उमेदवारी खा. विखे यांच्यासाठी ऐनवेळी खेळी करण्यासाठी पूरक ठरणार आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या