लोकनेता न्यूज
ऑनलाईन न्यूज नेटवर्कऑफर करते. ज्या प्लानमध्ये जास्त डेटा आहे. तो प्लान युजर्संना पसंत पडत असतो. या बेस्ट प्लानसोबत फ्री कॉलिंगची सुविधा मिळते. बीएसएनएलचा ४८५ रुपयांचा एक प्लान असून यात मोठी वैधता सोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि फायदा मिळतो.
बीएसएनएलचा हा एक प्लान कॉम्बो पॅक आहे. ९० दिवसांची
वैधता सोबत या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा मिळतो. यात एकूण १३५ जीबी डेटा दिला
जातो. प्लानमध्ये देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. प्लानचे
खास वैशिष्ट्ये म्हणजे यात कोणत्याही लिमिटविना फ्री कॉलिंग दिली जाते. प्लानमध्ये
रोज १०० फ्री एसएमएस दिले जातात.
एअरटेल आणि
जिओला टक्कर
बीएसएनएलचा हा प्लान एअरटेलच्या ५९८ रुपये आणि ५५५
रुपयांच्या प्लानला जोरदार टक्कर देत आहे. एअरटेलचा ५९८ रुपयांच्या प्लानमध्ये ८४
दिवसांची वैधता मिळते. कंपनी या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा ऑफर करते.
कॉलिंगसाठी या प्लानमध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर ट्रू अनलिमिटेड कॉलिंग
मिळते.
जिओच्या ५५५ रुपयांच्या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा ऑफर
केला जातो. ८४ दिवसांच्या वैधतेसोबत मिळणाऱ्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग
सोबत रोज १०० फ्री एसएमएस सुद्धा दिले जातात. प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात
सब्सक्राईबर्सला जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
0 टिप्पण्या