Ticker

    Loading......

नगर अर्बन बँक: माजी खा.दिलीप गांधींसह संचालकांवर गुन्हा दाखल !


 पिंपरी चिंचवड :्नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेतील दुसरा गैरप्रकार अखेर उघड झाला आहे. २२ कोटीच्या या कर्जवाटपाबाबतचा तो बहुप्रतीक्षेत असलेला गुन्हा अखेर पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथे दाखल झाला आहे.यात संबंधित कर्जदारांसह बँकेची कर्ज उपसमिती तसेच बँकेचे माजी अध्यक्ष व भाजपचे नगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाला आरोपी करण्यात आले आहे.

संचालक मंडळातील ज्या सदस्यांनी संबंधित २२ कोटीच्या कर्जास मंजुरी दिली, त्यांचा यात समावेश आहे. महिनाभरापूर्वीच बँकेच्या ३ कोटीच्या बोगस कर्ज प्रकरणी नगरच्या कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता बँकेच्या चिंचवडच्या शाखेतील गैरप्रकाराबद्दल गुन्हा दाखल झाला आहे.

नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेत २२ कोटीच्या कर्ज प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी नगर अर्बन बँक बचाव कृती समितीने करून मागच्या आठवड्यात प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते.त्याचवेळी प्रशासक मिश्रा यांनी बँकेचे प्रमुख व्यवस्थापक (वसुली) महादेव साळवे यांना संबंधित गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी २१ जानेवारीला चिंचवडला जाऊन सविस्तर तक्रार अर्ज दिला होता. त्याचा अभ्यास केल्यानंतर चिंचवड पोलिसांनी २५ जानेवारीला भारतीय दंड संहिता कलम ३४, ४२०, ४६५, ४६७, ४६८ व ४७१ अन्वये कर्जदार बबन चव्हाण, वंदना चव्हाण ,यज्ञेश चव्हाण तसेच मंजूदेवी हरिमोहन प्रसाद, रामचंद्र तांबिले (सर्व रा. चिंचवड), अभिजीत नाथा घुले (रा. बुरुडगाव रोड, नगर) यांच्यासह बँकेच्या कर्ज उपसमितीमधील सदस्य व नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे नगरसह बँकेच्या कार्यक्षेत्रात खळबळ उडाली आहे .




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या