लोकनेता न्यूज
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
काष्टी
:-भिंगाण खालसा दुमाला
या गावांमध्ये मुलींचा जन्म दर हा मुलांपेक्षा
जास्त. आहे. त्यात येथील एका गंभीर आजाराने पीडित असलेल्या बापाने आपल्या मूकबधिर मुलीचे अनेक प्रयत्नानंतर पुणे येथे
ससून रुग्णालयात उपचार केले. असून, शस्त्रक्रियेनंतर ती
मुलगी बोलू लागली आहे. या घटनेनंतर भिंगाण गावकऱ्यांनी आनंद उत्सव साजरा करीत आपली
लाडकी नावबदल (छकुली) बोलु लागल्यामुळे आईवडीलांच्या
आनंदाला पारावार राहिला नाही.
सविस्तर माहिती
अशी की,
तालुक्यातील भिंगाण गावांमधील महेंद्र विठ्ठल शेंडगे हा आजारी बाप व
आपल्या कुटुंबातील आपल्या मुलीला एक ते दीड वर्ष झाले, बोलता येत नसल्याने
काळजीने चिंता करू लागले होते, पुढे
भविष्यकाळात कसे होणार यासाठी त्यांनी अनेक वेळा पुणे,
मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये मुलीची तपासणी केली. परंतु यश आले
नाही.घरीची परिस्थिती हालाकिची त्यात, तीचे वडीलही नेहमी
आजारी असत, स्वतःच्या आजाराची चिंता बाजूला ठेवून मुकबधीर
मुलीला बोलता, ऐकता येत नाही. या तणावामध्ये महेंद्र शेंडगे
व त्यांच्या पत्नीने पुणे येथील ससून रुग्णालयात मुलीवर शस्त्रक्रिया करण्याचे
ठरवले व त्यानुसार तिच्यावर तज्ञ डाॕक्टराकडून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
त्यानंतर देवरुपी डाॕक्टराच्या प्रयत्नाने छकुली ही
मुलगी बोलू, ऐकू लागली. आई
वडिलांच्या प्रयत्नांना यश आले. यानंतर कुटुंबाचा आनंद गगणात मावेना झाला आहे.
आजारपणात
मुलीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून स्वतःच्या आजारपणापेक्षा मुलीच्या उपचाराला
प्राधान्य देत, तिची शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्या बापाच्या
प्रयत्नाला संपूर्ण भिगाण गावासह तालुक्याने सॅल्युट
करीत, आनंद व्यक्त केला आहे. मुलीची प्रकृती अतिशय चांगली आहे. मुलगी ही काळाची आणि काळजीचीसुद्धा
गरज बनली आहे. त्यामुळे मुलगी शिकली ..प्रगती
झाली.. या सुविचारबरोबरच मुलगी नीट झाली ..बोलू लागली ..प्रगती झाली..असाच काहीसा भाव
उमटून गेला.
0 टिप्पण्या