मंत्री धनंजय मुंडे यांनी काल रात्री शनी शिंगणापुरला शनी देवाचा अभिषेक केला.
लोकनेता न्यूज
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
अहमदनगर : - करूना शर्मा यांच्यासोबतचा लिव्ह इनचा वाद परस्पर सहमतीनं मिटवण्यासाठी एका मध्यस्थाची नेमणूक करण्यात आली आहे. तो वाद मिटेल अशी आशा केली जात असतानाच धनंजय मुंडे शनी शिंगणापुरात पोहोचले. शिंगणापुरात शनी देवाला अभिषेक केल्यानंतर धनंजय मुंडेंमागची साडे साती संपलीय की संपावी म्हणून त्यांनी अभिषेक केला, याची जोरदार चर्चा रंगली आहे .
सद्य स्थितीत मुंडे एका मोठया सामाजिक -राजकीय संकटातून बाहेर पडत असल्याचं त्यांच्या पॉझिटिव्ह देहबोलीवरून जाणवत आहे . त्यातून पूर्णपणे मुक्त होण्यासाठी ते शनी चरणी लीन झाल्याचे मानले जात आहे .
धनंजय मुंडे जिथं जातील तिथं त्यांचं जोरदार स्वागत होत आहे. आधी बीड आणि आज नगरमध्ये जिथंही मुंडे गेले तिथं त्यांचं स्वागत केलं गेलं. जेसीबीतून गुलालाची उधळण केली गेली. धनंजय मुंडे तुम आगे बढोच्या लोकांनी घोषणा दिल्या
नगरमध्ये धनंजय मुंडेंचं जोरदार स्वागत
आधी रेणू शर्मा यांनी केलेले गंभीर आरोप आणि त्यानंतर आता करुणा शर्मा यांच्यासोबत होत असलेली परस्पर सेटलमेंट या दोन्ही बाबी धनंजय मुंडेंसाठी सकारात्मक आहेत. त्यांच्या वैयक्तिक जीवनातलं मोठं वादळ शमताना दिसत असतानाच धनंजय मुंडे जिथं जातील तिथं त्यांचं जोरदार स्वागत होत आहे. आधी बीड आणि आज नगरमध्ये जिथंही मुंडे गेले तिथं त्यांचं एखाद्या युद्धावरुन विजयी होऊन परतलेल्या योद्ध्यासारखं स्वागत केलं गेलं. जेसीबीतून गुलालाची उधळण केली गेली. फेटे बांधले गेले मुंडे तुम आगे बढोच्या लोकांनी घोषणा दिल्या. .
धनंजय मुंडेंना राजकीय फायदा होतोय?
शर्मा भगिनींच्या प्रकरणाचा धनंजय मुंडेंना सध्या तरी राजकीय फायदा होताना दिसतोय. शरद पवारांनी सुरुवातीला हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं होतं. पण कुठली पक्षीय कारवाई केली तर ओबीसी दुखावतील अशी भीती निर्माण होताच, राष्ट्रवादीनं मुंडेंवर कारवाई करणं टाळलं. त्यातच रेणू शर्मांनी तक्रार वापस घेतली. नंतर करुणा शर्मांसोबत सेटलमेंटसाठी मध्यस्थही तयार झाला आहे. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे स्वत:चा राजकीय खुट्टा बळकट करत असल्याचे दिसत आहे.
0 टिप्पण्या