नगर :-
सोशल मीडियाचा
वापर लहानांपासून ते वयोवृध्दांपर्यंत होत आहे . त्यामुळे सोशल मीडियाचा
निवडणूकीच्या प्रचारासाठी उमेदवारांकडून खुबीने वापर होत आहे . याच मीडियाच्या
माध्यमातून
संपर्क साधत
आपले म्हणणे ,
विचार
मतदारांच्या गळी उतरावित आहेत . निवडणूक गावात सोशल मीडियावरील प्रचारास उधाण आले
असल्याचे दिसत आहे .
नगर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवून नशीब अजमावीत आहेत . निवडणूक प्रचाराची
रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे . तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांकडून आपल्या
गावातील वर्चस्व अबाधीत राखण्यासाठी आटापीटा सुरु आहे . मतदारांना खुश करण्यासाठी
जेवणावळी होत आहे . हॉटेल धाब्यावर गर्दी वाढल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे .
उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेट घेत आपणच कसे ' नीट ' ( चांगले ) असल्याचे पटवून देत आहेत
.मतदारांच्या गाठीभेटी घेण्याबरोबरच उमेदवारांनी सोशल मीडियाचा प्रचारासाठी खुबीने
वापर करण्यास सुरुवात केली आहे .
सोशल मीडियाचा प्रचारासाठी वापर करून अनेक
राजकीय पक्षांनी यश मिळविले असल्याचे दिसून आले आहे . त्यामुळे ग्रामीण भागातील
सोशल मीडियाचा वाढलेला वापर लक्षात घेऊन ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारांकडून
मीडियाचा प्रचारासाठी वापर करण्याकडे कल वाढला आहे . फेसबुक , व्हॉट्सअप , टि्विटर या सारख्या सोशल साईटचा वापर करून
मतदारावर गावात आपलीच लाट असल्याचे बिंबविले जात आहे . उमेदवारांकडून डिजिटल
व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अँपलोड करत आपलीच ' हवा ' असल्याचे दाखवित प्रचाराची रणधुमाळी उडवित
आहेत . ग्रामपंचायत निवडणूकांच्या लढती स्पष्ट झाल्याने गावपातळीवरील राजकारण
तापले आहे . सोशल मीडियावर प्रचारगीतांच्या क्लिप धुमाकूळ घालत आहे . सोशल
मीडियावरून मोठया नेत्यांसह उमेदवारांचे फोटो कार्यकर्त्याकडून गावातील ग्रुप वर
व्हायरल होत आहेत .आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा
उमेदवारांकडून प्रभावीपणे वापर होत आहे .एकमेकांची खिल्ली उडविण्याचे प्रकार सोशल
मीडियावर वाढले आहेत . गावांगावातील विविध ग्रुप वर उमेदवारांची आरोप
प्रत्यारोपांची राजकीय जुगलबंदी रंगली आहे . त्यामुळे सोशल मीडियावर ग्रामपंचायत
निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगला आहे .
0 टिप्पण्या