Ticker

6/Breaking/ticker-posts

मनपात जिरवा जिरविच्या राजकारणात तत्वांना तिलांजली - किरण काळे

 


नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा संपन्न 

लोकनेता न्यूज  ऑनलाईन

अहमदनगर  : मनपात जिरवा जिरविच्या राजकारणात सत्ता स्थापन करताना तत्वांचे जोडे बाहेर काढून ठेवण्यात आले आहेत. केवळ मूठभर लोकांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी शहरातील सर्वसामान्य नागरिकांची मात्र दैनंदिन नागरी सुविधांसाठी ससेहोलपट होत आहे. नागरिकांच्या दुरावस्थेला वाचा फोडण्यासाठी शहरात विरोधी आवाज उरलेला नाही. त्यामुळे जनतेचा आवाज बनण्याचे काम काँग्रेस पक्ष शहरात इथून पुढे करेलसे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने तसेच आ. डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच शहर जिल्हा कॉंग्रेस कार्यकारिणी, ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष, विविध सेल अध्यक्ष यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा काळे यांच्या हस्ते सत्कार करीत पदग्रहण समारंभ नुकताच काँग्रेस कार्यालयात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

  यावेळी काळे म्हणाले की, .नगर शहरामध्ये नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. मनपा नागरिकांच्या प्रश्नांबाबत पूर्णतः असंवेदनशील आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अशावेळी नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करावे. नगरकरांच्या हितासाठी सर्वसामान्य जनतेचा आवाज बनत शहरात यापुढे काँग्रेस सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करेल.

  यावेळी जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, काँग्रेसचे नेते फारुक शेख, खलील सय्यद, निजाम जागीरदार, चिरंजीव गाढवे, नीता बर्वे, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, मुबीन शेख, प्रा.डॉ. बाळासाहेब पवार, कौसर खान, दानिश शेख आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी पक्षाने जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना कार्यकारणीमध्ये संधी दिल्याबद्दल नेत्यांचे आभार मानले. किरण काळे यांच्या रूपाने पक्षाला अनेक वर्षानंतर नगर शहरामध्ये दूरदृष्टी असणारे, निर्भीड आणि धडाडीचे नेतृत्व मिळाले आहे, अशी भावना यावेळी सर्वच वक्त्यांनी व्यक्त केली.शहर जिल्हा सचिव अन्वर सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. आभार अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख यांनी मानले. 

  यावेळी अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, क्रीडा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, अनंतराव गारदे, रियाज शेख, आय.जी. शहा, मोहनराव वाखुरे, अनिसभाई चुडीवाल, सुजित जगताप, साहिल शेख, नलिनीताई गायकवाड, नीता बर्वे, सुनिता बागडे, जरीना पठाण, उषा भगत, शबाना सय्यद, शिक्षक काँग्रेसचे प्रसाद शिंदे, ॲड.चेतन रोहकले, ॲड.अजित वाडेकर, अन्वर शेख, मुबीन शेख, गणेश आपरे, प्रशांत वाघ, शंकर आव्हाड, सिद्धेश्वर झेंडे, ॲड. सुरेश सोरटे, डॉ.साहिल सादिक, नासिर बागवान, अजय मिसाळ आदींसह नवनियुक्त पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या