Ticker

6/Breaking/ticker-posts

नेवासा तालुक्यावर ना. शंकरराव गडाख यांचीच ’ कमांड’


*ग्रामपंचायत   निवडणूक  विश्लेषण*

नेवासा  (वेब न्यूज टीम):-  नेवासे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या झालेल्या  निवडणूकीत  ना. शंकरराव गडाख गटाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून तालुक्यावर त्यांचीच एहाती कमांड असल्याचे स्पष्ट  झाले आहे . तालुक्यात   ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणूकीत सोनई मध्ये जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख माजी खासदार तुकाराम गडाख  या गटांमध्ये चुरशीची लढत झाली. याठिकाणी १६  जागांवर  ना.गडाख गटाला स्पष्ट बहुमत मिळाले तर तुकाराम गडाख गटाला शोभा प्रकाश शेटे ही एकमेव जागा जिंकून समाधान मानावे लागले. या सोनई ग्रामपंचायतीकडे तालुक्यासह जिल्ह्याच्या नजरा लागल्या होत्या. ना.गडाख गटाने एकहाती ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. तसेच तालुक्यातील दुसरी मोठी ग्रामपंचायत असलेल्या कुकाणा ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या  झालेल्या निवडणूकीत १५ पैकी जागांवर  माजी आमदार पांडूरंग अभंग गटाने बहुमत मिळवले. याठिकाणी देखील लक्ष वेधून घेणा-या लढती झाल्या. देशमुख गटाला सात जागा मिळाल्या आहेत. तर  भेंड्यात घुले गटाला बहुमत मिळाले आहे. 

   माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनि  स्वतः रहिवाशी असलेल्या देवगाव ग्रामपंचायतीमध्ये सत्ता अबाधित ठेवण्यास यश मिळविले आहे. याठिकाणीही चुरशीच्या लढती झाल्या आहेत. स्थानिक पातळीवर मुरकुटे गटाला शह देण्याचा जोरदार प्रयत्न झाला पंरतू विरोधकांना यश आले नाही. 

   तालुक्यातील ५९ ग्रामपंचायत निवडणूकीत ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. ५२ ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणूकीत अनेक गावात स्थानिक पातळीवर ना. शंकरराव गडाखांच्या दोन्ही अंतर्गत गटामध्येच निवडणूका झाल्या आहेत. निंभारी ग्रामपंचायतीच्या  निवडणूकीत कैलास जाधव गटाकडून सत्ता जावून गावपातळीवर आघाडी पॅनलला च्या जागा मिळाल्या आहेत. 

५२ ग्रामपंचायतींसाठी  १५ जानेवारीला ८१ टक्के  मतदान झाले. सोमवारी तहसिलदार रूपेश सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासे फाट्यावरील सरकारी गोडावून मध्ये मतमोजणी झाली. गोडावून बाहेर तालुक्यातील गावपातळीवरील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आपापल्या गावाचा  निकाल जाहिर होताच कार्यकर्त्यांनी  फटाके फोडून गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. नेवासे गावाकडे येणारी वाहतूक काही वेळा विस्कळीत झाली होती. विजयी उमेदवारांना मिरवणूकीस बंदी घातल्याने गावागावात गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. दुपारी दीड ते दोन वाजेपर्यंत निकाल जाहीर झाला. 

  सोनई,कुकाणा, भेंडा या लढती लक्षवेधी झाल्या. तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायत निवडणूकीत नामदार शंकरराव गडाख गटाला स्पष्ट बहुमत मिळाले तर देवगाव बाळासाहेब मुरकुटे,कुकाणा पांडूरंग अभंग तर भेंडा मध्ये घुले गटाने सत्ता मिळवली. अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती झाल्या.  बेल्लेकरवाडी- दत्तात्रय  बेल्हेकर गटाला भरत बेल्हेकर गटाला जागा, लांडेवाडी- संजय दरंदले- संभाजी घावटे , -हाणपूर -दिपक चव्हाण अशोक चव्हाण-किशोर विखे , शिंगवेतुकाई- सतिश थोरात योगेश होंडे ,निंभारी- भगिरथ जाधव-बाबासाहेब पवार कैलास जाधव गटाला एकही जागा मिळाली नाही. याठिकाणी स्थानिक पातळीवर सत्तांतर झाले आहे. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या