अहमदनगर :- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तब्बल सहा वर्षांनी होणाऱ्या
निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय नेतेमंडळींचा कस लागणार आहे. राज्यातील
महाविकास आघाडी सरकारने ग्रामपंचायत निवडणुकांपाठोपाठ सहकारी संस्थांच्या निवडणुका
घेण्याचे आदेश राज्य सहकार प्राधिकरणाला दिले आहेत. त्यामुळे प्राधिकरणाने आता
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक जाहीर केली आहे. २०१५मध्ये झालेल्या
निवडणुकीनंतर आता २०२१मध्ये बँकेची निवडणूक होत आहे. २० फेब्रुवारीला बँकेच्या २१
जागांसाठी मतदान होणार असून, २१ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्याचवेळी बँकेवर
वर्चस्व कोणाचे हे सिद्ध होणार आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी राज्य सहकार
प्राधिकरणाने जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून
नियुक्ती केली असून, त्यांनी निवडणूक निर्णय कार्यक्रम जाहीर केला आहे.
निवडणूक
कार्यक्रम असा
जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळ सदस्यांच्या
एकूण जागा-२१
(विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघ (प्रत्येक तालुक्यातून १) -जागा १४.
शेतीपूरक संस्था मतदार संघ- जागा १.
बिगर शेती संस्था मतदार संघ-जागा १.
राखीव जागा - ५ (यात महिला-२, अनुसूचित जाती-जमाती-१, इतर मागासवर्गीय-१, विमुक्त व भटक्या जमाती-१).
बँकेचे एकूण मतदार-(संस्था प्रतिनिधी)-३ हजार ५७७.
उमेदवारी दाखल करण्याची मुदत- १९ ते २५ जानेवारी
(स्थळ-जिल्हा सहकारी उपनिबंधक कार्यालय).
दाखल अर्जांची छाननी-२७ जानेवारी.
उमेदवारी माघारीसाठी मुदत- २८ जानेवारी ते ११
फेब्रुवारी. मतदान दिनांक- २० फेब्रुवारी व मतमोजणी-२१ फेब्रुवारी.
0 टिप्पण्या