संगमनेर तालुक्यातील पठारभागात बिबट्यांची दहशत वाढत आहे
. संगमनेर : - शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अकलापूर गावांतर्गत असलेल्या शेळकेवाडी येथे एका कारवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.परंतु, कारच्या सर्व काचा बंद असल्याने कारचालक तरुण बचावला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कारचालक गणेश दिलीप वाघ हा तरुण शेळकेवाडी येथून घारगावला कारमधून येत होता.त्याचवेळी शेळकेवाडी येथे रस्त्याच्यालगत असेल्या उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक कारवर हल्ला केला. परंतु, कारच्या सर्व काचा बंद असल्याने आणि कार वेगाने पुढे नेल्याने गणेश वाघ हल्ल्यातून बचावले आहे.
या घटनेने परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. दरम्यान, तीन-चार दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने दुचाकीवरुन जाणार्या नागरिकांवर बिबट्याने हल्ला चढविला होता. मात्र, प्रसंगावधान राखल्याने बालंबाल बचावले.
0 टिप्पण्या