बुऱ्हाणनगर मध्ये माजी आमदार शिवाजीराव कर्डिलेच
तालुक्यातील बुऱ्हाणनगर मध्ये माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात पुतणे रोहिदास कर्डिले व महाआघाडी विकास आघाडीने मोठे आव्हान उभे करूनही मतदारांनी त्यांचे आव्हान झुगारले.शिवाजी कर्डिले यांनी सर्वच्या सर्व जागा जागांवर बाजी मारीत आपले वर्चस्व सिद्ध केलेतालुक्यातील हिवरे बाजार येथील बिनविरोध निवडणूकीची परंपरा यंदा खंडीत झाली . ३५ वर्षानंतर मतदारांनी यावेळी मतदानाचा हक्क बजावला . या ठिकाणी पद्मश्री पोपटराव पवार यांनी निर्विवाद वर्चस्व राखले .टाकळी काझी येथे काँगेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के यांच्या ३५ वर्षाच्या सत्तेला विरोधी शंकरराव ढगे गटाने यावेळी सुरूंग लावला .सत्तेबरोबरच संपतराव म्हस्के यांच्या मुलाचा पराभव झाला . खंडाळा येथे जि.परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी गड राखला पण त्यांचा बंधुला पराभव स्वीकारावा लागला . रुई छत्तीशीमध्ये रमेश भांबरे गटाने सत्ता मिळविली असली तरी स्वत : मात्र पराभूत झाले . हातवळण मध्ये पांडूरंग जाधव यांची २५ वर्षांची सत्ता ढासळली . बुऱ्हाणनगरमध्ये माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे , प्रा . गाडे सर व कर्डिलेंचे पुतणे रोहिदास कर्डिले यांनी शर्थीचे प्रयत्न करूनही मा .आ . कर्डिले यांनी ३० वर्षाची सत्ता कायम राखली .
निंबळकमध्ये माधवराव लामखेडे यांनी सत्ता राखली . पण सुनेला पराभवाचा धक्का बसला .डोंगरगणमध्ये कैलास पठारे यांची २० वर्षाची सत्ता धुळीस मिळाली .पठारे यांना स्वतः पराभवाचा धक्का बसला .एकूणच तालुक्यातील अनेक गावात तरूणांनी प्रस्थापितांविरोधात आघाडी उघडली होती . मात्र मतदारांनी प्रस्थापितांच्या झोळीत आपले मत टाकल्याचे दिसून आले . तालुक्यातील नेत्यांकडून आगामी निवडणूकीच्या दृष्टीने महत्व देण्यात आल्याचे दिसले . गावपातळीवर सत्तेचे समीकरण जुळविण्यासाठी भाजप विरुद्ध भाजप , आघाडीविरुद्ध आघाडी अशा लढती झाल्या . चिचोंडी पाटील मध्ये सेनेचे नेत प्रविण कोकाटे व भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी हातमिळवणी करत सत्तांतर घडवून आणले .या निवडणूकीत भाजप व महाआघाडी यांच्यात वर्चस्वासाठी सामना झाला असला तरी मतदारांनी कोणालाच एकहाती वर्चस्वाची संधी दिली नसल्याचे या निवडणुकीत दिसून आले .
.खारे कर्जुने येथे जि.प.चे उपाध्यक्ष प्रताप शेळके व अंकुश शेळके यांच्या गटाच्या सर्व जागा निवडून आल्या असून गेल्या ६५ वर्षांची त्यांची सत्ता त्यांनी पुन्हा काबीज केली आहे.टाकळी काझी येथे कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के यांच्या ताब्यात असलेली गावाची ३५ वर्षांची सत्ता यंदा संपुष्टात आली तेथे शिवसेनेचा भगवा फडकला.गुंडेगाव मध्ये माजी सभापती बाळासाहेब हराळ यांच्या ताब्यात असणारी २० वर्षांची सत्ता आता अपक्ष उमेदवाराच्या हातात गेली असून तेथे महाविकास आघाडी ६ व भाजप ६ जागांवर निवडून आली असून एक अपक्ष निवडून आला आहे.भोरवाडी येथे माजी सभापती रामदास भोर यांच्या गटाचा पराभव झाला . येथे भास्कर भोर गटाने ९पैकी ७ जागा जिंकून रामदास भोर यांच्या वीस वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावला . निंबळक येथे जि.प.सदस्य माधवराव लामखडे यांनी पुन्हा गावात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे . नवनागापूर येथे माजी पंचायत समिती सदस्य बबनराव डोंगरे व दत्ता पाटील सप्रे हे विरोधक एकत्र आल्याने तेथे विरोधी शिवसेना आघाडीचा दारुण पराभव झाला.चिचोंडी पाटील येथे सत्ता परिवर्तन झालेे .पंचायत समितीचे सभापती प्रवीण कोकाटे व भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी गावाची सत्ता पुन्हा खेचून आणली तेथे विरोधी शरद पवार गट ,बाजीराव हजारे गटाचा पराभव झाला.तांदळी वडगाव येथे बाजार समितीचे सभापती अभिलाष घिग व रमेश ठोंबरे हे विरोधक एकत्र आल्याने त्यांनी विरोधी आघाडीचा धुव्वा अडवला.
जेऊरमध्ये भाजपच्या १५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला असून तेथे महाविकास आघाडीने काठावर बहुमत मिळवले.इमामपूर येथे जि.प.सदस्य गोविंद मोकाटे यांनी १० वर्षांची सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे.दरेवाडी येथेही सरपंच अनिल करांडे व भानुदास बेरड यांनी २० वर्षांची सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. पिंपळगाव माळवी येथे भाजपने महाविकास आघाडीचा पराभव केला आहे.वाकोडी येथे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले यांनी आपली पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले.देहरे येथे पंचायत समितीचे सदस्य विठ्ठल काळे गटाला पराभवाचा सामना करावा लागला.रुई छ्तीशी मध्ये भाजपने पुन्हा आपली सत्ता मिळवण्यात यश मिळवले.चास येथे महाविकास आघाडीने आपली सत्ता पुन्हा ताब्यात ठेवली आहे.कामरगाव येथे रावसाहेब साठे यांच्या २० वर्षांच्या सत्तेला सुरुंग बसला तेथे सैनिक संघटना व महाआघाडीने एकत्र येत बाजी मारली.वाटेफळ येथे २० वर्षांनंतर सत्ता परिवर्तन झाले.सांडवे ,बाराबाभळी येथे भाजपने सत्ता राखली.तर गुणवडी,धनगरवाडी,मांडवे येथे महाविकास आघाडीने बाजी मारली.वाळूंज येथे निवडणूक महाआघाडीच्या पाठींब्या गावातील तरुणांनी आव्हान उभे केले होते मात्र उपसभापती संतोष म्हस्के.महेंद्र हिंगे,बाळासाहेब दरेकर महादेव शेळमकर यांच्या गटाने विरोधकांचा धुव्वा उडवत एकतर्फी बाजी मारली.
हिवरे बाजार येथे ३५ वर्षापासून असलेली बिनविरोध निवडणूकीची परंपरा खंडीत झाली . येथे प्रथमच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला . या निवडणूकीत पोपटराव पवार यांनी सर्व जागा जिंकत बाजी मारली . मांजरसुंबा येथे भाजपने सत्ता राखली . मांडवा येथे महाआघाडीने सत्ता परिवर्तन घडविले असून भाजपचा पराभव झाला आहे . वाटेफळ मध्ये दत्ता नारळे गटाचा पराभव झाला असून उध्दव अमृते , रवि अमृते यांनी सत्ता परिवर्तन घडविले आहे . घोसपुरीत मा . सभापती अशोक झरेकर , प्रभाकर घोडके यांच्या गटाने बाजी मारली .
गुंडेगावात सत्तेचा दोर अपक्षाच्या हाती
जि .परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांना एकहाती सत्ता राखण्यात अपयश आले . हराळ गटाला ६ जागा तर विरोधी गटाला ६ जागा मिळाल्या . या ठिकाणी एकमेव अपक्ष संतोष भापकर यांनी बाजी मारल्याने सत्तेचा दोर आपल्या हाती ठेवला आहे .
0 टिप्पण्या