महाराष्ट्र ग्रामपंचायत
निवडणूक निकाल जाहीर होत आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये
12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक
निवडणुका पार पडल्या. या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांची
मतमोजणी होते आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या.
मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. राज्यातील पहिला निकाल सकाळी
पावणे नऊच्या सुमारास जाहीर झाला. हातकणंगले तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार
विनय कोरे यांच्या पॅनेलने पाडळी गावात विजय मिळवला
ग्रामपंचायत निवडणूक
निकाल – सकाळी 10.30 वाजेपर्यंतच चित्र
काँग्रेस-१४७
राष्ट्रवादी–२२१
शिवसेना–३३१
भाजप-२६६
मनसे-५
स्था आघाडी – ५२१
·
राज्यातील 10 मोठे निकाल, कुठे कोण जिंकलं?
– राज्यातील पहिला निकाल जनसुराज्यला, हातकणंगलेत विनय कोरेंचा विजय
-हिवरे बाजारात पोपटराव पवारांचा दबदबा, 7-0 ने विजय
– कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना धक्का
-भुदरगडमध्ये प्रकाश आबिटकरांनी सत्ता राखली
– माळशिरसमध्ये मोहित पाटील यांचं वर्चस्व
-पाटण तालुक्यातील दहापैकी सहा ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा
– औरंगाबाद जिल्ह्यात 40 ठिकाणी महाविकास आघाडी आघाडीवर
-कोल्हापूर – हातकणंगले – पाडळी – जनसुराज्य पक्ष
सोलापूर – केडगाव – संजयमामा शिंदे पॅनल
– सोलापूर – अक्कलकोट- मोट्याळ- कार्तिक पाटील पॅनेल
0 टिप्पण्या