Ticker

6/Breaking/ticker-posts

संत भगवान बाबांची पुण्यतिथी यावर्षी साधेपणाने साजरी होणार ..किर्तन व महाप्रसाद नाही .

 

भाविकांनी गडावर येण्याऐवजी गावातच पुण्यतिथी  साजरी करावी- महंत डॉ . नामदेव शास्त्रीचे आवाहन


भगवानगड:-  संत भगवान बाबांची २९ जानेवारी रोजी पुण्यतिथी असून   भाविकानी भगवानगडावर न येता आप-आपल्या गावातच बाबांची पुण्यतिथी साजरी करावी, कोरोनो विषाणुच्या साथरोगामुळे दक्षता म्हणुन श्री क्षेत्र भगवान गडावर  संत भगवान बाबाची  पुण्यतिथी या वर्षी भाविकांच्या  अनुउपस्थितीत  अत्यंत साध्यापणाने साजरी करण्यात येणार आहे, अशी माहीती श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी दिली. 

     श्री क्षेत्र भगवान गडावर  संत भगवान बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त  दरवर्षी  महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातील भावीकभक्त बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. पुण्यतिथी दिवशी किर्तन व महाप्रसादासाठी भावीकाची गर्दी होते . सध्या कोरोनो विषाणुमुळे होणाऱ्या कोरोना बाधीत रूग्णाचा  वेग मदांवला असला तरी पुर्ण पणे खंड झाला नाही . कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर  संत भगवान बाबांच्या पुण्यतिथीचा जर दरवर्षी प्रमाणे  पुण्यतिथीचा कार्यक्रम केल्यास  भावीकाच्या आरोग्यास धोका होऊ शकतो, म्हणुन सुरक्षाच्या दुष्टीने ट्रस्टने  निर्णय घेतला असून  पारंपारिक पद्वधतीने भगवान गडावरिल ज्ञानेश्वरी विद्यापिठातिल विद्यार्थाच्या उपस्थित पुण्यतिथी साध्या पद्वधतीने  साजरी होणार आहे.

    यापुर्वी ही कोरोनाच्या पाश्र्वभुमीमुळे श्री क्षेत्र भगवान गडावरिल मुख्य कार्यक्रम असणारा दसरा मेळावा व सीमोल्लंघन सोहळा  तसेच गुरू पोर्णीमा, गुरु पुजन सोहळा आषाढी वारी, वार्षीक नारळी सप्ताह  रद्द करण्यात आला  होता. शासनाच्या आदेशाप्रमाणे भावीकाना  दर्शनासाठी भगवान गडाचे महाद्वार खुले झाले आहे.  मात्र भाविकाची गर्दी होणारे धार्मिक क्रार्यक्रम सध्या बंद आहेत.

            महंत  शास्त्री म्हणाले कीराज्याच्या कानाकोपऱ्यातून पुण्यतिथीसाठी  भाविक लाखोच्या संख्येने येतात, दैनंदिन दर्शनासाठी सुद्धा भाविकांची गर्दी असते. गडावर ज्ञानेश्वरी विद्यापिठाची वारकरी संप्रदायाचे शिक्षण विद्यार्थी घेत आहेत . लॉक डाऊन मध्ये एकही विद्यार्थी प्रवेशद्वाराबाहेर गेला नाही. गडावरील एकाही व्यक्तीला बाबांच्या कृपेने कोरोना रोगाची बाधा झाली नाही. गडावर दैनंदिन  धार्मिक विधी, नियमित सुरू होते. आता  भाविक बाबांच्या समाधीचे दर्शन  घेऊन माघारी फिरतात. कुणालाही  समाधी मंदीर सोडता गडाच्या इतर वास्तु व परिसरात प्रवेश दिला जात नाही. पुण्यतिथीस  भावीकाच्या गर्दीचा अंदाज पाहता पुण्यतिथी सोहळा  भाविकांना त्रासदायक होऊ नये म्हणून मोठी पुण्यतिथी सोहळा  रद्द केला.

    भाविकांची  सुरक्षा व आरोग्य सर्वात महत्त्वाचे समजून असा निर्णय घेऊन पुण्यतिथीचे सर्व पारंपरिक विधी गडावरील विद्यार्थ्यांच्या उपस्थतीत होतील. तरी भावीकानी गर्दी करू नये  असे आवाहन  महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी केले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या