पुणे : देशभरात कोरोना लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली आहे. BCG लस बनवण्याच्या इमारतीला आग लागलेली आहे. ज्या ठिकाणी बी सी जी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
सिरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग विझवणे आणि हानी टाळणे याला सद्यस्थितीत
प्राधान्य आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. त्यांनी म्हटलंय की, पुण्यातील
सिरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु सुरू
आहेत. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग विझविण्याचा आणि मदत कार्यात
झाल्या आहेत. पुणे आयुक्तांकडून मी यासंदर्भातली माहिती घेतली असून दुर्घटनेच्या सखोल
चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात देशातून
आणि देशाबाहेरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मी स्पष्ट करू इच्छितो की,
कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित असल्याचे मला सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत
आग विझवणे आणि दुर्घटनेमुळे होणारी हानी नियंत्रित ठेवणे यास सध्या प्राधान्य देण्यात
येत आहे.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्या ठिकाणी आग
लागली तिथं करोना व्हॅक्सीन बनत नाही तर बीसीजीसाठीची लस बनते. आग विझवण्याचे शर्थीचे
प्रयत्न सुरू आहेत. आत्तापर्यंत तरी कुठल्याही जिवीतहानीबद्दलची माहिती नाही. मी तातडीने
घटनास्थळी रवाना होत आहे, अशी माहिती खासदार गिरीश बापट यांनी दिली.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही व्हॅक्सीन बनवणारी जगातील सर्वात
मोठी कंपनी आहे. कोरोनावरील लसीची निर्मिती इथं मे महिन्यापासून सुरू आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून
पोलिओ, डायरीया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली
जाते. आज जगभरात वेगवेगळ्या आजारांवरती ज्या लसींचा उपयोग केला जातो त्यापैकी 65 टक्के
लसी या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात.
सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये आग लागण्याच्या घटनेबाबत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना तातडीने आग नियंत्रणात
आणण्याच्या सूचना दिल्या. राज्याच्या यंत्रणेला देखील निर्देश दिले असून आता परिस्थिती
नियंत्रणात आहे. आग संपूर्णपणे विझवण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येत आहे, अशी माहिती
मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये आग लागण्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना तातडीने आग नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या. राज्याच्या यंत्रणेला देखील निर्देश दिले असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आग संपूर्णपणे विझवण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येत आहे. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या