कोलकाता: बीबीसीआयचे अध्यक्ष आणि
टीम इंडियाचे माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांची तब्येत पुन्हा बिघडली आहे.
सौरव गांगुली यांच्या आज अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना कोलकाताच्या अपोलो
रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात
आली होती. त्यानंतर 7 जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयातून
डिस्चार्ज देण्यात आला होता.
काही दिवसांपूर्वीच म्हणजे 2 जानेवारी रोजी
सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. आपल्या घरातील जिममध्ये
व्यायाम करताना त्यांच्या छातीत दुखू लागलं. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने
वूडलॅण्ड्स रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली.
"गांगुली यांच्या हृदयात काही गंभीर ब्लॉक होते, त्यांना
स्टेंट लावला आहे," असं वूडलॅण्ड्स रुग्णालयाच्या सीईओ
डॉ. रुपाली बासू आणि डॉ. सरोज मंडल यांनी सांगितलं.
डिस्चार्ज
मिळाल्यानंतर काय म्हणाले गांगली ?
0 टिप्पण्या