Ticker

6/Breaking/ticker-posts

तिसगावला लवकरच ट्रामा सेंटर- ना. तनपूरे

 

पाथर्डी: -  राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी  तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देत पाहणी केली. येथील अडीअडचणीची विचारपूस करत या ठिकाणी ट्रामा सेंटर सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.  

 आरोग्य केंद्राकडे अचानक भेट देऊन तनपूरे यांनी इमारत आदी बाबीची पाहणी केली. लाखो रुपयांची भव्य इमारत असली तरी याठिकाणी एक वैद्यकीय अधीकारी, नर्स, शिपाई आदी कर्मचारी पद रिक्त असल्याचे यावेळी राज्यमंत्री तनपूरे यांना सांगण्यात आले. हे पद भरण्यासाठी तातडीने लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. युवानेते भाऊसाहेब लवांडे पाटील यांनी सांगितले की साहेब हे राष्ट्रीय महामार्गावरील व मोठे बाजारपेठ चे गाव असल्याने या ठिकाणी ट्रामा सेंटर अथवा ग्रामीण रुग्णालय सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव या पूर्वी पाठविलेला आहे. त्यावर अजून काही कार्यवाही झालेली नाही.  अद्यावत सोई सुविधा उपलब्ध झाल्यास परिसरातील तसेच अपघात ग्रस्त प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकेल. नर्सिंग सेंटर च्या इमारती साठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही इमारत पूर्ण होऊन अनेक वर्षे उलटले असले तरी देखील सध्या धूळ खात पडून आहे असे ही युवानेते भाऊसाहेब लवांडे पाटील यांनी राज्यमंत्री तनपुरे यांना सांगितले.

            या आरोग्य केंद्रातील रिक्त पद भरण्यासाठी तातडीने कारवाई केली जाईल . ट्रामा सेंटर आणि नर्सिंग सेंटर च्या प्रश्ना बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेवून हा प्रश्न देखील लवकरच मार्गी लावला जाईल असे राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यानी यावेळी सांगितले . यावेळी जवखेडे चे सरपंच अमोल वाघ , माजी उपसरपंच इलियास शेख, ग्रामपंचायत सदस्य अमोल वाबळे,पापा तांबोळी, अविनाश नरवडे, लक्ष्मण जवणे, सामाजिक न्याय विभागाचे पाथर्डी तालुका अंबादास शिंदे , युवासेनेचे अनिल रांधवणे , शिरापुर चे युवानेते नितीन लोमटे, घाटशिरसचे युवानेते गणेश पालवे, संजय लवांडे, सुनील लवांडे, मांडवेचे युवानेते महेश लवांडे, शिक्षक नेते कल्याण लवांडे, जेष्ठ नागरिक संघाचे शरद साखरे सर, उद्योजक दिलीप गांधीडॉ होडशीळ, इकबाल शेखकरंजीचे युवानेते जालिंदर वामन , सातवड चे युवानेते अजय पाठक, लक्ष्मण गवळी, अखिल लवांडे, पोपटराव पालवे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या