अहमदनगर :- नेवासा तालुक्यातील वांबोरी चारी शेती सिंचनापासून वंचित असणाऱ्या बारा गावांना वांबोरी चारीत सामाविष्ट करण्यासाठी नुकतीच मुंबई येथे मंत्रालयात राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या उपस्थित जलसंपदा विभागाच्या दालनात मंत्रालयात बैठक घेण्यात आली असून लवकरच याबाबत निर्णय घेण्याची घोषना ना. कडू यांनी केली आहे.
प्रहारचे
जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला जलसंपदा विभागाचे
प्रधान सचिव,
सचिव (लक्षवेधी) जलसंपदा विभाग, सचिव (प्रकल्प
समन्वयक) जलसंपदा विभाग, मुख्य अभियंता उत्तर महाराष्ट्र
प्रदेश नाशिक, अधीक्षक अभियंता नाशिक पाटबंधारे मंडळ नाशिक,
अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगर, कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर, कार्यकारी
अभियंता अहमदनगर मध्यम प्रकल्प विभाग अहमदनगर आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेवासा
तालुका उपाध्यक्ष संजय वाघ, जिल्हा समन्वयक महादेव आव्हाड,
जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, ज्ञानेश्वर
सांगळे जिल्हा संघटक सर्व बैठकीत उपस्थित होते
बैठकीमध्ये सुरुवातीलाच
विषयाची मांडणी करताना शेती सिंचनाचे पाणी मिळवण्यासाठी तीव्र स्वरूपाचेआंदोलने
झाली आश्वासने मिळाली मात्र आजपर्यंत पाटबंधारे विभागाने काहीच हालचाली केल्या
नाही इथून मागच्या सरकार मधील जलसंपदा विभागाच्या आडमुठे धोरणामुळे लाभ
क्षेत्रातील पांगरमल, राजेगाव, मांडेगव्हाण,
मोरगव्हाण, वाघवाडी, झापवाडी,
लोहगाव, शिंगवे तुकाई अशी गावे जाणीवपूर्वक
वगळली आणि वांबोरी चारी ते वाघवाडी शेती सिंचनासाठी असलेली पाईपलाईन तलाव क्रमांक
३८ आणि ३९ सुरू होण्यापूर्वीच नादुरुस्त असल्याचे सांगितले यावर बोलताना नाशिक विभागाचे अधिक्षक अभियंता त्यांनी १०२ तलावात आणखी
बंधारे किंवा तलाव जोडणे शक्य नसल्याचे सांगितले यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी
जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून योजनेकडे बघावे वांबोरी चारी
पाईपलाईन योजनेच्या फुटबॉल ची खोली कशी वाढवता येईल धरणातील गाळ काढून जलसाठा
वाढवता येईल का मुळा धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून वाया जाणाऱ्या
अतिरिक्त पाण्याचे काटेकोर नियोजन करा आणि पावसाळ्यामध्ये मुळा धरण ओव्हरफ्लो होत
असताना या वंचित असणाऱ्या गावांचे बंधारे कसे भरता येतील या गावांच्या एका बाजूने
वांबोरी पाईपलाईन जाते व दुसऱ्या बाजूने काही अंतरावरून मुळा धरणाचा कालवा जातो
यामधून शेतीला सिंचनासाठी कसे पाणी देता येईल याचे नियोजन करा आणि पाठ पाणी चालू
असताना ड्रोन द्वारे व्हिडीओ चित्रीकरण करा तात्काळ मुळा धरणाची पाटपाण्याची समिती
स्थापन करा व सर्वेक्षण अहवाल तात्काळ एक महिन्याच्या आत सादर करा असे
नाशिक अधिक्षक अभियंता पाटबंधारे विभाग नाशिक यांना असे समक्ष आदेश
बच्चू कडू यांनी दिले या कामासाठी तात्काळ निधीची तरतूद केली जाईल. असे पोटे यांनी
दिलेल्या पत्रकात म्हटले आहे .
वांबोरी
चारीतून या सर्व गावांना शेती सिंचनासाठी पाणी मिळवून देण्यासाठी जिल्हाध्यक्ष
अभिजित पोटे दोन वर्षापासून अथक प्रयत्न करत आहेत त्यासाठी त्यांनी गेल्या वर्षी
नगर औरंगाबाद हायवेवर पांढरीपुल येथे तीन ते चार हजार शेतकऱ्यांना घेऊन जनावरांसह
मोठे रास्ता रोको चक्का जाम आंदोलन केले होते अखेर जलसंपदा राज्यमंत्री बच्चुभाऊ
कडू यांनी त्यांची दखल घेऊन तात्काळ मंत्रालयात बैठक लावून ही योजना सकारात्मक
दृष्टीने कशी पूर्ण करता येईल लवकरात लवकर शेती सिंचनासाठी पाणी कसे देता येईल असे
बैठकीत ठरले आहे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना
दिलेल्या शब्दाची अखेर वचनपूर्ती होणार आहे॰
0 टिप्पण्या