Ticker

6/Breaking/ticker-posts

महिलांच्या सन्मानातूनच सबलीकरण घडते-अड .ढाकणे

 









चुंभळी येथे संक्रांत कुंकवा पलीकडे उपक्रम

टाकळीमानुर :- आपण सर्वांनी एकविसाव्या शतकाकडे पदार्पण केले असून जुन्या रुढी परंपरा या संस्कारक्षम मार्गदर्शक ठरतात त्याचा सन्मान राखला पाहिजे, त्यावर नैतिकतेची वाटचाल आधारित आहेत मात्र आज त्याचा उगीच बाऊ करून अर्थाचा अनर्थ काढून शापित ठरविण्याचा अधिकार आपल्याला नाही नशिबाचा फटका बसलेल्यांना दैनंदिन जीवनातून आपल्या वागणुकीतून त्यांचा सन्मान राखला पाहिजे, त्यातूनच खर्‍या अर्थाने महिलांचे सबलीकरण घडत असते असे प्रतिपादन श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अड. प्रतापराव  ढाकणे यांनी केले।

पाथर्डी तालुक्यातील चुंभळी येथे संक्रांत कुंकवा पलीकडे या उपक्रमा अंतर्गत मनीषा ढाकणे यांनी संक्रांतीच्या महिन्यात विधवा महिलांचा सन्मान करून सुमारे एकशे एकवीस महिलांना साडी-चोळी वाटप करण्यात आले. त्यावेळी ढाकणे बोलत होते अध्यक्षस्थानी बाबासाहेब ढाकणे होते ,यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य उज्वला शिरसाट ,राजेंद्र नागरे ,संभाजी ढाकणे ,अशोक शिरसाट ,राजेंद्र गाडे, ढाकणे तुकाराम, बी के ढाकणे, नेहरकर आदी उपस्थित होते.

            मानवाने विज्ञानाच्या आधारावर प्रगती साधली विज्ञानाने अनेक अविष्कार आपल्यासमोर येत असतात. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनशैलीवर परिणाम झाला आहे. नियम व्यवहार आणि अध्यात्म व विज्ञान यांची योग्य सांगड घालत बदलते स्वरूप स्वीकारले पाहिजे. वैयक्तिक आयुष्यात एखाद्याचा वाटयला काही दुःख आली असेल तर त्या व्यक्तीला जबाबदार धरणे योग्य नाही. त्यासाठी अनिष्ट रूढी व परंपरा यांना तिलांजली देऊन देऊन सन्मानाने अशा व्यक्तींचा  सन्मान राखला दाखवा ही आजची गरज आहे . वैद्यव्य आलेल्या महिलांना सन्मानाची वागणूक देण्याची गरज आहे . यातूनच महिलांचे सबलीकरण ,महिला सशक्त  करण्याचा मानस  आहे असे ढाकणे यांनी शेवटी संगितले .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या