अहमदनगर :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठने बीए प्रथम वर्ष, एमए द्वितीय वर्षासाठीच्या विद्यार्थ्यांसाठी “डेमोक्रसी, इलेक्शन अँड गव्हर्नन्स” हा अतिरिक्त आभ्यासक्रम सुरु केला आहे. कोरोनामुळे शैक्षणिक घडी विस्कटलेली असताना हा नवीन आभ्यासक्रम विद्यार्थ्यांवर लादणे अन्यायकारक असून त्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी तात्काळ स्थगित देण्यात यावी अशी मागणी नगर विद्यार्थी कॉंग्रेस – एनएसयूआयच्या वतीने करण्यात आली आहे.
शहर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली याबाबतचे निवेदन विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक प्रा. डॉ. एन. आर. सोमवंशी यांना देण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि.चिरंजीव गाढवे, प्रशांत जाधव, सुजित जगताप, युवक कॉंग्रेस अध्यक्ष ॲड.अक्षय कुलट, क्रीडा कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रविणभैय्या गीते पाटील, योगेश जयस्वाल, धनंजय महारनोर, महेश कचरे, निखील गलांडे, प्रकाश थोरात, संकेत गवळी, ओम जगताप, ओंकार दरेकर, ऋषिकेश चितळकर महेश सानप, अमित गुंड, आदित्य बेरड, सिद्धांत गिरवले, ज्ञानेश्वर लोखंडे, सुरज बोडके, शिवम करांडे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मागणीसाठी विद्यापीठ उपकेंद्रा बाहेर विद्यार्थी कॉंग्रेसने निदर्शने केली.
याबाबत विद्यापीठाने तात्काळ उचित निर्णय न घेल्यास प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या माध्यमातून शहर कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या मार्ग्दर्शानाखाली या विषयावर विद्यार्थी कॉंग्रेस आवाज उठवील, असे इंजि. चिरंजीव गाढवे, प्रशांत जाधव, सुजित जगताप यांनी म्हटले आहे.
0 टिप्पण्या