अहमदनगर - कोरोना विषाणूचा धोका अद्याप टळलेला नाही .याच दरम्यान बर्ड फ्लु आजाराने लोकांची चिंता वाढवली आहे. चार दिवसापूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील भान गाव येथील मृत कावळा
रिपोर्ट आज सकाळी आला . तसेच जामखेड तालुक्यातील मोहागावतील मृत्यू झालेल्या कावळाचे नमुने तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा रिपोर्ट
दुपारी मिळाला. या दोन्ही ठिकाणचे मृत कावळे पॉझिटिव्ह आलेने
नगर जिल्ह्यात ‘ बर्ड फ्लु’ ने
एंट्री केल्याचे निष्पन्न झाले असून सर्वत्र
एकच खळबळ उडाली आहे.
जामखेड पासून 4 किलोमीटर अंतरावर जामखेड बीड रोडवरील मोहागावा जवळ कावळा आणि कोकिळा पक्षी मृत आढळून आले होते.बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर त्या कावळ्याचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्याचा आवाहल काल दुपारी पॉझिटिव्ह आलेची माहिती पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गवारे यांनी दिली .
कावळा व कोकिळा पक्षी व अन्य दोन तीन पक्षी तडफडत असताना नागरिकांनी पाहिल्यानंतर याबाबतची माहिती वनविभागास देण्यात आली होती.दरम्यान पशुधन विकास अधिकाऱ्यांसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली . मृत कावळा व कोकिळा पक्षीचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सतर्कता पाळण्यात येत आहे. बर्ड फ्ल्यु बाबत जनजागृती केली जात असून , कुठेही पक्षी मृत आढळल्यास वनविभागाला संपर्क साधावा . अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनादेखील सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत॰ जामखेड
व श्रीगोंदा तालुक्यात एकाही कोंबड्याचा मृत्यू झालेला नाही तरी 'बर्ड फ्लु'च्या पार्श्वभूमीवर कोंबड्यांचे नमुने घेतले असुन तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.जिल्ह्यातील
अन्य तालुक्यात ही खबरदारीचा उपाय म्हणून कोंबड्याचे नुमुने घेण्यात येत आहेत.
0 टिप्पण्या