पतसंस्थांना जिल्हा बँकेत प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे- काका कोयटे
अहमदनगर :नगर जिल्हा सहकारी बँकेमध्ये सहकारी पतसंस्थांचा 25 टक्क्यांहून अधिक सहभाग आहे. मात्र अद्याप सहकारी पतसंस्थांना जिल्हा बँकेमध्ये प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. पतसंस्थांना प्रतिनिधीत्व
मिळावे, यासाठी पतसंस्थाचळवळीमधील उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली.
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी बिगर शेती मतदार संघातून नाशिक पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा यांनी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या उपस्थितीत निवडणुक निर्णय अधिकारी उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, भाजपाचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर, सचिन पारखी, अॅड.विवेक नाईक, महेश नामदे आदि उपस्थित होते.
यावेळी वसंत लोढा म्हणाले, राज्यातील व जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशन, स्थैर्यनिधी सहकारी संघ व नाशिक पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून सातत्याने आंदोलनात्मक भुमिका घेऊन शासन दरबारी पाठपुरावठा करत आहेत. केलेल्या आंदोलनामुळे पतसंस्थांचे बहुतांशी प्रश्न मार्गी लागले आहेत. जिल्हा बँक आणि सहकारी पतसंस्था यांचे अतुट नाते आहे. मात्र अद्याप जिल्हा बँकेमध्ये पतसंस्थांना एकदाही प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. यासाठीच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी करण्याचा निर्णय घेत बिगर शेती मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वसंत लोढा यांनी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात महाआरती करुन उमेदवारी अर्ज दाखल केला.
0 टिप्पण्या