Ticker

6/Breaking/ticker-posts

भूलथापा मारून निवडणूका जिंकता येत नाहीत - आ कर्डिले

 



बुऱ्हानगरमध्ये  नगर तालुक्‍यातील नूतन ग्रा.पं सदस्यांचा सत्कार
 


अहमदनगर -  राज्यामध्ये जेव्हा जेव्हा शिवसेनेची सत्ता असताना नगर ता मध्ये किती विकास कामे केले ते आधी दाखवावे पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या काळात यांनी नगर तालुक्यामध्ये विकासासाठी काय दिवे लावले ते आधी सांगावे साकळाई योजनेला मंजूरी नाही, पाणी नाही आणि जलसमाधीही नाही भूलथापा मारून निवडणूका  जिंकता येत नाहीत, असा टोला  माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी  महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला .

नगर तालुक्‍यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत संदस्याचा बुन्हाणनगर येथे शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की महाविकास आघाडी ही जनतेच्या भल्यासाठी व विकासासाठी नाहीतर फक्त निवडणुकीसाठी व माझ्यावर टिका करण्यासाठी झाली आहे. विकास कामे करून निवडणूका जिंकता येतात. गेली तीस वर्ष नगर तालुक्‍यातील जनतेचा विकास कामातून विश्वास संपादन केल्यामुळे ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये ४५ ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे, 
 कर्डिले म्हणाले की, पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले. सरपंच पदापासून ते मंत्रीपदापर्यंत जाण्याची संधी तालुक्‍यातील जनतेने मला दिले आहे. जिल्हा बँकेची ओळख ही कारखानदाऱ्याची बँक म्हणून ओळखली जायची मात्र आता शेतकऱ्याची बॅक म्हणून ओळखली जावू लागली. नवनिर्वाचित सदस्यांनी पदाचा उपयोग गावासाठी व गावाच्या विकासासाठी करावा. निवडून आल्यानंतर डोक्यात हवा जावून देऊ नका व विकास कामांना प्राधान्य क्रम देऊन वार्डाचा विकास प्रत्येक सदस्यांनी करावा. जनता ही विकास करणाऱ्या माणसाबरोबर राहते. असे ते म्हणाले.

अभिलाष धिगे म्हणाले की महाविकास आघाडीच्या नेत्यानी ग्रामपंचायतमध्ये निवडूण आलेल्या गावाची व सदस्यांची नावे जाहिर करावे. खोटी माहिती देऊ नये आपल्यावर तालुक्‍यातील जनतेचा विश्‍वास नाही तुम्हाला ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये पूर्णपणे नाकारले आहे. तालुक्‍याच्या विकासासाठी तुमचे योगदान काय आहे हे आधी सांगावे. हिवरेबाजार, पिंपरीघुमट, बुऱ्हानगर हे गावे बिनविरोध होत असतांना गावात तेल ओतले व निवडणूका लादल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना निवडणूका हाच एकमेव धंदा आहे लवकरच आम्ही पत्रकार परिषद गावच्या संख्येबरोबर संदस्याची नावे ही जाहिर करू असे ते म्हणाले.

दिलीप भालसिंग म्हणाले की, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये नगर तालुक्‍यातील जनतेने ४५ ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकावला आहे. आज बुऱ्हानगर येथे मोठ्या संख्येने सदस्य एकत्र येऊन आनंद साजरा केला. व कर्डिलेचे नेतृत्व मान्य
केले. महाविकास आघाडीच्या नेत्यानी आरोप करण्याआधी स्वतःचे आत्मपरिक्षण करावे. नुसत्या निवडणूकापुरते काम करू नका तर जनतेचे प्रश्न सोडवा.

यावेळी बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, युवानेता अक्षय कर्डिले, खरेदी विक्रीचे चेअरमन सुरेश सुंबे, रेवन चोभे, मनोज कोकाटे, दिलीप भालसिंग, अंबादास बेरड, बाबासाहेब खर्से, नाना भामरे, जालिदंर कदम, दिपक करले, वसंत सोनवणे, संभाजी पवार, बन्सी कराळे, रावसाहेब वाघसकर, गणेश आवारे, कचरू घोरपडे, प्रकाश पालवे, बाळासाहेब दरेकर, शिवाजी कार्ले, रभाजी सुळ, सुनिल पवार, विकास कोथबिंरे, अशोक आव्हाड, बाजीराव हजारे, सुभाष निमसे, विष्णू खादवे, दादा दरेकर, बबन हराळ, संतोष भापकर, धनराज सप्रे, गणेश साठे, नाथा शेट आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या