Ticker

6/Breaking/ticker-posts

चांदा परिसरातील” सैराट बिबट्या” अखेर पिंजऱ्यात..!

 


अजून दोन बिबटे असल्याची ग्रामस्थांची माहिती
लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क  

नेवासा:-नेवासा तालुक्यातील चांदा परिसरात गेले दोन महिन्यापासून धुडगुस घालणारा व सातत्याने गुंगारा देणारा ” सैराट बिबट्या  प्रदिर्घ कालखंडानंतर अखेर  पिंजऱ्यात  अडकल्याने परिसरातील शेतकर्‍यांसाह ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला  आहे. चांदयाजवळील रस्तापुर शिवारात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात काल रात्री एक बिबटया अडकला मात्र अजूनही या परिसरात दोन बिबटे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितल्याने हा आनंद फार काळ टिकला नाही.  परिसरात भिती कायम आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी  की, अमृत बन्सीलाल मुथ्था यांच्या गट नं ३१५मध्ये बांबू शेताकडेला गेल्या सोमवारी वन विभागाने या परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पिंजरा लावला होता या परिसरात दोन ते तीन बिबटयांचा सतत वावर असल्याचे तेथील शेतकऱ्यांचे म्हणणे होते . या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात बिबटयाला भक्ष म्हणून एक शेळी ठेवण्यात आली होती काल गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास भक्षाच्या शोधार्थ या ठिकाणी आलेला बिबट्या अलगत पिंजऱ्यात अडकला त्याच बाजूला मुथ्था यांची शेती कसणारे दिलीप आठरे  नानासाहेब पुंड व राजू बडेॅ हे रात्री गव्हाला पाणि देत होते . त्यांच्यापासून साधारण पाचशे फुटाच्या अंतरावर हा पिंजरा होता .बिबट्या पिंजऱ्यात जात दरवाजा लॉकपडल्याचा आवाज या दोघांनाही आला .पहाटे त्यांनी बॅटरीच्या प्रकाशझोतात पाहिले असता बिबटया पिंजऱ्यात दिसला त्यांनी ताबडतोब आपल्या घराच्या दरवाज्याचे कुलुप आणून पिंजऱ्याला लावले आणि मोठ्या धाडसाने शेजारील पिंजऱ्यातील शेळी बाहेर काढली व तातडीने रस्तापूर चे सरपंच वसंतराव ऊकीडेॅ व चांदा गावचे पोलिस पाटिल कैलास अभिनव यांना या घटनेची माहिती दिली त्यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधला .

          वन विभागाने तावडतोब घटनास्थळी येत बिबटा जेरबंद पिंजरा गाडीत टाकून नेला. अहमदनर वनक्षेत्र अधिकारी सुनिल थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली डि .के. पातारे यांच्या सुचनेनुसार नेवासा वन विभागाचे एमआय सय्यद, डी. टी . गाडे , सी .ई .ढेरे याच्या पथकाने योग्य नियोजन करत जेरबंद बिबट्याला तेथून तातडीने हलविले हा बिबट्या साधारण पाच ते सहा वर्षाचा असल्याचे श्री सय्यद यांनी सांगितले तो नर जातीचा आहे . बिबट्याला पाहण्यासाठी भल्या सकाळी तोबा गर्दी झाली होती . अनेकांनी मोबाईल कॅमेऱ्यात बिबटयाला टिपले  या ठिकाणीच पून्हा पिंजरा लावावा अशी मागणी या वेळी तेथे उपस्थित असणाऱ्या युवक शेतकऱ्यांनी केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या