पाथर्डी:-खडतर प्रयत्नातून मनुष्य घडतो, संघर्ष करण्याची ताकत आपल्यात असेल तर त्या व्यक्तीला अधिक अधिक यशस्वी पणे यश मिळवण्यास कोणीच रोखू शकत नाही असे प्रतिपादन पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले.
पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड
महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. सुभाष शेकडे यांची नुकतीच कला शाखेअंतर्गत मराठी
विषयात प्रोफेसरपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड
यांच्या हस्ते सन्मान
करण्यात आला .यावेळी प्राचार्य डॉ जी पी ढाकणे,प्राध्यापक
तथा संस्थेचे विश्वस्त बबन चौरे, प्रा
शेखर ससाणे,प्रा.अजय
पालवे,प्रा.विजय
देशमुख,प्रा.मन्सूर
शेख,प्रा
दत्तप्रसाद पालवे,प्रा
प्रदीप वारूळकर, प्रा
डॉ अभिमन्यू ढोरमाळे, प्रा
ब्रह्मानंद दराडे,ग्रंथपाल
किरण गुदगड
आदी उपस्थित होते.
डॉ.
शेकडे यांचे वडील उसतोडणी कामगार होते. त्यांनी वडिलांसोबत उसतोडणी करता करता
उच्चशिक्षण घेतले. माजी आमदार तथा स्वतंत्र सेनानी स्व. बाबुजी आव्हाड यांच्या
प्रेरणेने ते सन १९८९ मध्ये बाबुजी आव्हाड महविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून
रुजू झाले. त्यांचे मराठी विषयावरील अनेक संशोधन ग्रंथ प्रकाशित झाले असून त्यांची
दखल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड व मुंबई विद्यापीठाच्या
अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ म्हणून घेतली गेली आहे. त्यांचे हाणला कोयता झालो
मास्तर हे आत्मकथन महाराष्ट्रभर गाजले. या अत्माकथनास अनेक पुरस्कार प्राप्त झाले.
डॉ. शेकडे हे स्वतः पी.एचडी. व एम.फिल.चे मार्गदर्शक असून त्यांचे मार्गदर्शनाखाली
एम.फिल.चे ९ व पी.एचडी. चे ३
विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
0 टिप्पण्या