नवी दिल्ली:- बाळासाहेब थोरातांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवल्यानंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलासाठी खलबतांना वेग आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालट होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी तीन नाव सुचवा असं आवाहन प्रदेश काँग्रेस प्रतिनिधींना करण्यात आलं आहे. एचके पाटील यांच्या आवाजात सर्व नेत्यांना एक डिजिटल कॉल जात आहे. काँग्रेसच्या शक्ती ॲप द्वारे हे डिजिटल मतदान घेतलं जात आहे. दोन दिवस मंथन केल्यानंतर आता डिजिटल मत घेण्याचीही तयारी सुरू झाली आहे.
महाराष्ट्र प्रदेश
काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी नुकतंच महाराष्ट्रात येऊन काँग्रेसच्या तीन
बड्या नेत्यांचा कल जाणून घेतला होता. आता एचके पाटील यांच्या आवाजात सर्व
नेत्यांना एक डिजिटल कॉल जात आहे. काँग्रेसच्या शक्ती ॲपद्वारे हे डिजिटल मतदान
घेतलं जात आहे. महाराष्ट्रात 557 प्रदेश प्रतिनिधी
आहेत. प्रत्येकाला पसंतीक्रमानुसार मत नोंदवायला सांगितले आहे.
0 टिप्पण्या