Ticker

6/Breaking/ticker-posts

त्यामुळे आम्ही राळेगणसिद्धीमध्ये निवडणूक करायचे ठरविले- अण्णा हजारे

 

अहमदनगर: राळेगणसिद्धीतील निवडणुकांबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘राळेगणसिद्धीमध्ये ३५ वर्षे ग्रामपंचायतीची निवडणूक नव्हती. यावेळी गावातील काही तरुण माझ्याकडे आले. ते म्हणाले, निवडणूक झाली नाही तर आम्हाला लोकशाही कशी कळणार? त्यामुळे आपण लोकांना सांगितले की, त्यांची इच्छा आहे तर होऊ द्या निवडणूक., असे  ज्येष्ठ समाजसेव
 अण्णा हजारे यांनी आपल्याकडील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्याची कारणमिमांसा दिली आहे.

 ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्याची परंपरा आदर्शगाव राळेगणसिद्धी  हिवरेबाजार येथेही यावेळी खंडित झाली. यासंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलताना हजारे यांनी याची कारणे सांगितली. त्यासाठी त्यांनी पश्चिम बंगालमधील सध्याच्या परिस्थितीचेही उदाहरण दिले. हजारे म्हणाले, ‘दिवसेंदिवस निवडणुकांचे वातावरण बदलत आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये जे चालले आहे, ते आपण पाहातो आहोत. सत्तेसाठी भांडणे, खून, मारामाऱ्या सुरू आहेत. सत्तेसाठी असे प्रकार करणे ही खरी लोकशाही नाही. ही ठोकशाही झाली. हे दृश्य पाहणाऱ्या नवीन तरुणांच्या मनात महात्वाकांक्षा निर्माण होऊन त्यांनाही निवडणूक लढवावीशी वाटते. निवडणूक लढविणे हा दोष नव्हे. निवडणूक झालीच पाहिजे.’ असे सांगत, हजारे यांनी बंगालमधील परिस्थितीवर बोट ठेवत त्याचा संबंध बिनविरोध निवडणुका होण्याशीही जोडला.

     राळेगणसिद्धीतील निवडणुकांबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘राळेगणसिद्धीमध्ये ३५ वर्षे ग्रामपंचायतीची निवडणूक नव्हती. यावेळी गावातील काही तरुण माझ्याकडे आले. ते म्हणाले, निवडणूक झाली नाही तर आम्हाला लोकशाही कशी कळणार? त्यामुळे आपण लोकांना सांगितले की, त्यांची इच्छा आहे तर होऊ द्या निवडणूक. फक्त भांडणतंटा करायचा नाही. त्यामुळे यावेळी राळेगणसिद्धीमध्ये आम्ही निवडणूक करायचे ठरविले आहे. बरेचसे कार्यकर्ते केवळ निवडणुकीची इच्छा ठेवतात मात्र, करत काहीच नाहीत. अनेक जण निवडणुकीत उभे राहिले तर निवडूनही येत नाहीत. मात्र, त्यांची इच्छा आहे, आणि आपण लोकशाही स्वीकारली आहे तर यांना नको कसे म्हणार? म्हणून निवडणूक होत आहे. पूर्वी एका निवडणुकीत आम्ही सर्व महिला उभ्या केल्या होत्या. त्यांच्याविरुद्ध उभे राहण्याची कोणाची हिंमत झाली नाही. कारण महिलांकडून होणारा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला असता. त्यामुळे त्यावेळी निवडणूक बिनविरोध झाली,’ असे सांगून त्यामुळे यावेळी राळेगणसिद्धीमध्ये आम्ही निवडणूक करायचे ठरविले आहे  यापूर्वी निवडणुका बिनविरोध करण्याच्या पद्धतीचेही त्यांनी उदाहरण दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या