लोकनेता न्यूज
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
अहमदनगर :- ग्रामीण विकास केंद्र संचालित निवारा बालगृह
आयोजित निवारा महोत्सवाचे रविवार दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. निवारा बालगृह
समता भुमी,
मोहा फाटा, बीड रोड, जामखेड
येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण विकास
केंद्राचे संस्थापक डॉ. अरुण जाधव यांनी दिली.
निर्मलग्राम पाटोदा (जिल्हा औरंगाबाद) चे
माजी सरपंच व प्रबोधनकार भास्करराव पेरे पाटील यांचे 'गाव सेवा
हीच खरी सेवा' या विषयावर व्याख्यान, सामाजिक
कृतज्ञता पुरस्कार, दिवंगत लोक कलावंत हिराबाई जाधव स्मृती
सांस्कृतिक पुरस्कार वितरण, लोककलावंतांचा सत्कार, मनोरंजनातून प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी होणार आहे.
ग्रामीण विकास केंद्राचे जेष्ठ विश्वस्थ
प्रा. डॉ. बाळासाहेब बळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतरावजी मुंडे, जामखेड
चे तहसीलदार विशाल नाईकवाडे, जामखेडचे पोलीस निरीक्षक
संभाजीराव गायकवाड, ऊसतोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष
प्रा. शिवराज बांगर, करमाळा येथील व्यापारी अजित सोनी,
गटविकास अधिकारी परशुराम कोकणी आदी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून
उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे
प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, महिला मंडळ फेडरेशन च्या अध्यक्षा मुमताज शेख, टोल
ग्रुप पुणे च्या एच. आर. मॅनेजर जयंतीताई फडके, इकोनेट पुणे
च्या सी. इ. ओ. गौरी ताई भोपटकर, नाशिक चे उद्योजक संदिप
बोराडे, कोरो मुंबई चे सूर्यकांत कांबळे, शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांना सामाजिक कृतज्ञता
पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी निर्मलग्राम पाटोदया चे सरपंच
भास्करराव पेरे पाटील व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या
हस्ते जामखेड मधील पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे.
लावणी सम्राज्ञी संजीवनी मुळे नगरकर यांना
दिवंगत लोक कलावंत हिराबाई जाधव स्मृती सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात
येणार आहे. शाहीर हसन शेख पाटेवाडीकर, शाहीर दिलीप शिंदे यांचाही
यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. शाहीर भारत गाडेकर, शाहीर
वसंत डंबाळे, शाहीर दिलीप शिंदे, आणि
सहकाऱ्यांचा मनोरंजनातून प्रबोधन करणारा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या
कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक ॲड.
डॉ.अरुण जाधव, अध्यक्षा अलकताई जाधव, सचिव
उमाताई जाधव, जेष्ठ विश्वस्थ प्रा. बाळासाहेब बळे, संचालक बापू ओहोळ, निवारा बालगृहाचे अधिक्षक वैजीनाथ
केसकर, प्रसिद्धी प्रमुख भगवान राऊत यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण विकास
केंद्राचे संचालक बापू ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प समन्वयक सचिन
भिंगारदिवे,
सागर भांगरे, अरुण डोळस, मच्छीन्द्र जाधव, विशाल जाधव, वैजीनाथ
केसकर, द्वारकाताई पवार, अतिष पारवे,
संतोष चव्हाण, राकेश साळवे आदी परिश्रम घेत
आहेत.
0 टिप्पण्या