अहमदनगर :- गेले १० महिन्यांपासून कोरोंनामुले बंद असलेले कोचिंग क्लासेस
सुरू करण्यास परवानगी मिळावी ,अशी मागणी प्रो फेशनल टीचर्स असोसिशिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ . राजेंद्र
भोसले यांच्याकडे करण्यात आली आहे.
अनलॉकची
प्रक्रिया
सुरू झाली असून अनेक क्षेत्राचे व्यवहार पूर्ववत
सुरू झाले आहेत . मात्र आमचे क्लासेस अध्याप बंदच आहेत. येथे अजून अनलॉक झालेले नाही.
त्यामुळे अनेक प्राध्यापक बेरोजगार झाले आहेत.
नगर जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात
आहे. शाळा गेले एक महिन्यापासून सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये कोविड रुग्ण आढलेले नाहीत.
पुण्यात कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे नगरमध्येहि
परवानगी देण्यात यावी, अशी मागणी
जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आलेली आहे.
यावेळी असोसिशिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा. बाळासाहेब किर्तने , प्रा. रोहित रामदिन प्रा. आनंद पोळ, प्रा. विजय
शेटे, प्रा. सच्चिदानंद घोणसे , प्रा. रविंद्र
काळे, प्रा. विजय कांडके, प्रा. प्रकाश
जोशी, प्रा. श्रीकांत सोनटक्के, प्रा. विवेक
धर्माधिकारी, प्रा. किरण
कालरा, प्रा. भगवान गवते , प्रा. संदीप
घुमरे , प्रा. राजेश मुंडे, प्रा. अशोक काळे, प्रा. मनोज पाटील ,अविनाश जाधव आदि
उपस्थित होते.
दरम्यान
सध्याच्या स्थितीत कोचिंग क्लासेसचा हा व्यवसाय सुमारे ४० टक्के बंद झाला असून अनेक
क्लास चालक बेरोजगार झाले आहेत. आर्थिक संकटामुळे मानसिक नैराश्यातून आत्म्ह्त्येसारखा
विचार करू लागले आहेत. तरी याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा व कोचिंग क्लासेस सुरू
करण्यास सत्वर परवानगी मिळावी अन्यथा बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल , असा इशाराहि देण्यात
आला आहे.
0 टिप्पण्या