ऑनलाईन न्यूज नेटवर्क
लोकनेता न्यूज
अहमदनगर :- जिल्हा बँक ही काही राजकीय धुडगूस घालण्याची संस्था नव्हे, मंत्री बाळासाहेब थोरात हे मोठे
नेते आहेत, मात्र त्यांचे जिल्हा बँकेकडे लक्ष नाही.
त्यामुळे खऱ्या अर्थाने मातृसंस्था व कामधेनू असलेली
जिल्हा बँक बुडाली तर जिल्ह्यातील साखर कारखाने, सेवा
सोसायट्या तसेच हजारो शेतकऱ्यांचे प्रपंच उघड्यावर पडतील. त्यामुळे त्यांनी यात लक्ष
घालावे. असा सल्ला बँकेचे माजी अध्यक्ष ,ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी दिला आहे. .
गेल्या तीन वर्षांमध्ये जिल्हा बँकेवर बेकायदेशीर नोकर भरतीसह
अनेक आरोप झाले. त्याच बरोबर जवळ जवळ
शंभर कोटी रुपये राहुरी साखर कारखान्याकडे थकलेले असून ते
वसूल होतील की नाही हे माहीत नाही. अनुउत्पादीत
कर्जाचे ( 'एनपीए) प्रमाण खूप वाढलेले आहे, ही चिंताजनक बाब आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती
ढासळलेली आहे. अशा अवस्थेत बँकेकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी अपेक्षाही गडाख
यांनी व्यक्त केली .
0 टिप्पण्या