Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत पवारांच्या कानपिचक्या : २७ ला मुंबईत महत्वाची बैठक

 


अहमदनगर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जेष्ठनेते शरद पवार आज अनेक महिन्यांनी नगरमध्ये आल्यावर  आ.अरुण जगताप व आ.संग्राम जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी  स्वागत केले. यावेळी त्यांनी जगताप यांच्या  निवासस्थानी भोजन करून जिल्हा बँकेच्या निवड नुवडणूकीबाबत जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा करून त्यांना खास पवार शैलीत कानयपीचक्या दिल्या.

           लॉकडाऊन नंतरच्या मोठ्या कालावधीने खा.शरद पवार नगरमध्ये आल्याने आमदार जगताप द्वियांनी व सचिन जगताप यांनी त्यांचे जोरदार स्वागत करून सत्कार केला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. निलेश लंके, आ. लहू कानडे, आ.आशुतोष काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार नरेंद्र घुले, राहुल जगताप, माजी आ . चंद्रशेखर घुले, जेष्ठनेते पांडुरंग आभंग, उदय शेळके, घन:श्याम शेलार, नगरध्यक्षा अनुराधा आदिक आदी उपस्थित होते.  तोंडाला मास्क लावलेल्या खा. शरद पवार यांनी गाडीतून उतरताच उपस्थित सर्व नेत्यांना तोंडाला मास्क लावण्याची सूचना केली.

          यावेळी खा.शरद पवार यांनी उपस्थित सर्व नेत्यांबरोबर जिल्हा बँकेच्या होणाऱ्या निवडणुकीबाबत चर्चा करून परिस्थितीची सखोल माहिती  घेतली. यावेळी चंद्रशेखर घुले, पांडुरंग आभंग यांनी निवडणुकीच्या सद्य  परिस्थीची सविस्तर माहिती दिली. महाआघाडीच्या सर्व नेत्यांनी एकत्र राहून ही निवडणूक लढवावी अशी सूचना करून त्यांनी बँकेच्या निवडणुकीच्या नियोजनासाठी २७ जानेवारीला मुंबईत बैठक घेऊ. उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी मुंबईत यावे, अशी सूचना केली.         

          जगपात कुटुंबियांच्या वतीने खा. शरद पवार यांचा आ.अरुण जगताप व आ.संग्राम जगताप यांनी सत्कार केला. यावेळी पार्वती जगताप, जी.प.सदस्य सुवर्णा जगताप, नगरसेविका शीतल जगताप, विलास जगताप, डॉ.शशिकांत फटके, डॉ.वंदना फाटके, वैभव जगताप, विकी जगताप आदी उपस्थित होते. यावेळी जगताप यांचे निवासस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या