Ticker

6/Breaking/ticker-posts

काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुशीलकुमार शिंदे यांचं नांव आघाडीवर

 

मुंबई : काँग्रेस कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक होत आहे. त्याआधीच काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंब बाहेरील व्यक्ती अध्यक्ष होऊ शकतो ही चर्चा सुरु झाली आहे. राहुल गांधी नेतृत्व स्वीकारण्यास तयार नसल्यामुळे गांधी कुटुंबाच्या विश्वासू व्यक्तीकडे नेतृत्व देणार असल्याचं सांगितलं जात आहे. यात सुशील कुमार शिंदे, मीरा कुमार आणि अशोक गेहलोत यांची नावं शर्यतीत असल्याचं समजतं. अशोक गेहलोत राज्य सोडण्यास अनुत्सुक असल्याने काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुशील कुमार शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीतील एका गटाकडून सुशील कुमार शिंदे यांच्या नावाचे संकेत मिळत आहे.

            राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष कोण होणार याबाबत चर्चा सुरु झाली होती. यानंतर सोनिया गांधी यांच्याकडेच काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद देण्यात आलं. परंतु त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे आता काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज असल्याची समोर आलं. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशा नावं  चर्चेत आहेत जी गांधी कुटुंबाच्या विश्वासातील आहेत आणि काँग्रेसच्या विचारांची आहेत. यामध्ये सुशीलकुमार शिंदे, मीरा कुमार आणि अशोक गेहलोत ही तीन नावं पुढे आली आहेत.

            अशोक गेहलोत राज्य सोडून दिल्लीत जाण्यास तयार नसल्याने सुशीलकुमार शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीआधी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा रंगते. आता एका गटाकडून सुशीलकुमार शिंदे यांचं नाव पुढे आलं आहे. परंतु शिंदेंच्या निकटवर्तीयांकडून यामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आजच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत कोणता निर्णय होणार? अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर होणार का? गांधी कुटुंबातील की गांधी कुटुंबाखेरीज व्यक्ती काँग्रेस अध्यक्ष होणार हे पाहणं उत्सुकतेच असेल.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या