Ticker

6/Breaking/ticker-posts

' त्यांना ' मुंडे नावाची अॅलर्जी आहे का ? बाळासाहेबांचा घणाघाती हल्ला .. !


 औरंगाबाद : - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे प्रकरणात रोज नव्- नविन ट्विस्ट समोर येत असून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे . या पार्श्वभूमीवर आता जय भगवान सेनेनं मुंडे यांच्या समर्थनार्थ उडी घेतली आहे . त्यांना मुंडे नावाची अॅलर्जी आहे का ? असा सवाल उपस्थित करून कोणत्याही परिस्थिती वंजारी समाजासह संपूर्ण ओबीसी समाज ना . मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे , वेळ प्रसंगी अशा प्रवृतींना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही , असा इशारा भगवान महासंघाचे संस्थाथापक , ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी दिला आहे .

मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला सानप यांनी फेसबुक वरून राज्यातील तमाम भगवान सैनिक आणि जनतेशी संवाद साधला . यावेळी पुढे बोलतांना सानप म्हणाले की , क्षेत्र कोणतेही असो प्रत्येकाला एका ठराविक उंचिवर पोहचायला कठोर मेहनत व परिश्रम घ्यावे लागतात , मात्र कोणी लुंग्या - सुंग्या उठून आरोप करायला सुरु करतो . त्यांना अचानक जाग येते, जुनाट कधीचे काही तरी काढून त्याला नवीन माल मसाला लावून फोडणी दिली जाते .  कट - कारस्थानं आखली जातात . अशी अनेक उदाहरणं देता येतील . अशातलाच हा प्रकार आहे . 

सानप म्हणाले की , स्व . लोकनेते गोपिनाथ मुंडे यांच्या सारखं नेतृत्व या राज्यात उदयाला आलं , त्यांनी अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून कर्तृत्व घडवलं . कोणताही भेद केला नाही . सर्व जाति धर्मासाठी , सर्व समाजासाठी मोठं काम उभं केलं . राज्याच्या गुन्हेगारीला कायमचं गाडून विकासाची दिशा दिली .परंतु त्यांच्या बाबतीत सुद्धा काय झालं हे जनतेनं पाहिलं आहे सोईस्करपणे त्यांना संपवलं गेलं . पुढे पंकजाताई  त्यांचा हा वारसा समर्थपणे चालवू लागल्या . मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाची झलक दाखविली . विघ्नसंतोषी लोकांनी कारस्थानं करून त्यांचा पराभव केला . आता धनंजय मुंडे सारख अभ्यासू धडाकेबाज नेतुत्व  राज्यात आपली स्वतंत्र चमक दाखवू लागलं असतांना त्यांच्या विरूद्ध षडयंत्र रचली जाऊ लागलीत . कधीचे जुने विषय काढून त्यांना बदनाम करण्याचा डाव खेळला जात आहे . एवढया वर्षांनी जुनं उकरून काढलं जातं  , मग इतके दिवस झोपले होते का ?  बाकीच्यांच्या .....खाली असलेला अंधार दिसत नाही का ? वैयक्तिक पातळीवर चिखलफेक करून ओबीसी नेतृत्वच संपविण्याचा हा कुटिल डाव आहे . त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी जय भगवान महासंघ , वंजारी समाजासह संपूर्ण ओबीसी समाज खंबीरपणे उभा राहिल अशी ग्वाही सानप यांनी दिली . करणी सेनेपाठोपाठ आता भगवान महासंघ व ओबीसी समाज मुंडे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याने याचे पडसाद उमटणार आहेत .




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या