लोकनेता न्यूज
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर : -निवृत्तीनंतर पेंशनवर अवलंबून असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. खरं तर, लवकरच असे पेन्शन प्रोडक्ट लॉन्च केले जाऊ शकते, ज्यामध्ये आपल्याला अधिक नियमित उत्पन्न मिळेल. त्यामुळे महागाई बरोबर पेंशन सुधा वाढत जाईल .
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) च्या अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, फ्लोटिंग रेट अॅन्युइटी उत्पादनाच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यासाठी एक गटाची स्थापना केली गेली आहे.
इंश्योरेंस ब्रोकर्स एसोसिएशन ऑफ इंडिया (आईबीएआई) च्या 17 व्या वार्षिक शिखर परिषदेत वर्चुअल पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली. नवीन पेन्शन योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे महागाई वाढल्यास पेन्शनधारकांना अधिक पैसे मिळतील.
चलनवाढ निर्देशांकाशी असेल लिंक:जेव्हा एकूण व्याज दर कमी होतो तेव्हा जीवनाची सामान्य लागत देखील कमी होते आणि जेव्हा व्याज दर वाढतो तेव्हा जीवनाची सामान्य लागत देखील वाढते. आयआरडीएआय एक फ्लोटिंग रेट अॅन्युइटी पर्याय आणण्याची योजना आखत आहे जी जी-सेक (सरकारी सिक्युरिटीज) किंवा चलनवाढ निर्देशांक सारख्या बेंचमार्कशी जोडली जाऊ शकते. असे प्रोडक्ट बरेच चांगले असेल, कारण वाढत्या महागाईमुळे दैनंदिन जीवन जगात असताना जास्त पैसे लागतो.
0 टिप्पण्या