ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागल्यापासून वॄत्त वाहिन्या अन् सोशल मिडीयावर बहू चर्चित असलेली बातमी म्हणजे "आदर्श ग्रामपंचायत असलेल्या पेरे पाटील यांच्या मुलीचा पराभव". त्या जोडीला आदर्श गांव राळेगण सिद्धी अन् हिवरेबाजार मध्ये झालेली निवडणूक ..
आदर्श सरपंच म्हणून देशभरात नाव कमावलेल्या 'भास्कर पेरेपाटील 'यांच्या मुलीचा ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव.अख्या गावाचा काया पालट करणाऱ्या माणसावर जर ही वेळ येतेय.तर...यात आपण कुठे आहोत याचे परीक्षण होणे गरजेचे आहे. हा पेरे पाटलाच्या मुलीचा पराभव नसून,हा भारतीय लोकशाहीचा पराभव आहे. एकीकडे आपण म्हणतो "लोकांनी,लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होयपण याच लोकशाहीत जर आदर्श ग्रामपंचायत निर्माण करून देशात आदर्श निर्माण करणाऱ्या पेरे पाटलावर व त्यांच्या मुलीवर ही वेळ येत असेल तर माझ्या बंधूंनो,मतदार राजांनो,हा भारतीय लोकशाहीचाच पराभव आहे.
त्यांचा पराभव का झाला याचे खरे कारण काय असेल माहित नाही.पण निकाल लागल्या नंतर मतदारराजांच्या चर्चेनुसार बऱ्याच ग्रामपंचायत निवडणुकीत खूप पैसा चालला अशीच कट्ट्या,कट्ट्यावर खूप चर्चा चालू आहे ..काही मतदारसंघात,मतदार राजा हा विकल्या गेला.अशी मी आत्तापर्यंत फक्त चर्चा ऐकून होतो.पण यावेळी जरा मतदारसंघात,मतदार राजा जरा जास्तच प्रमाणात विकला गेल्याची चर्चा ऐकून मन अगदी खिन्न झाले.आणि विचार आला.
याचसाठी का भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहून,या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य व प्रत्येक नागरिकाला नागरिक्तवाचा व अमूल्य मतदानाचा अधिकार बहाल केला ?आणि त्यात ही पेरे पाटलांच्या मुलीची चर्चा ऐकून वाटले खरंच मतदारसंघात,मतदार राजा विकल्या गेला का? आणि ज्या लोकशाही मधे मतदारसंघात, मतदार राजा विकल्या जाईल.जो आपले मतदान पैसे घेऊन फक्त समोरचा उमेद्वार हा पैशा वाला आहे,तोच आपल्याला जास्त पैसे देईल,म्हणून त्याच्याकडून पैसे घेऊन प्रत्येक मतदारसंघात,मतदार राजा जर मतदान करायला लागला तर या देशात खरी लोकशाही कशी जिवंत राहील ? लोकशाही असलेल्या देशात जर निवडून येणारा उमेद्वार मतदारसंघात,मतदार राजाचे मतच विकत घेत असेल.आणि मतदार देखील आपल्या मताची किंमत लावत असेल तर कुठे आहे लोकशाही ?अशाने परत या देशात आदर्श ग्रामपंचायत निर्माण करणारे,देशासमोर आदर्श निर्माण करणारे पेरे पाटील कसे व कुठे निर्माण होतील ?
आणि असाच मतदारसंघात,मतदार राजा विकत चालला...तर या देशाची लोकशाही मोडीत निघून,चुकीच्या लोकांच्या हातात,ग्रामपंचायत ,पंचायत समिती,जिल्हा परिषद,नगर पंचायत,.नगर परिषद,महानगरपालिका,विधानसभा,विधान परिषद,लोकसभा .राज्यसभा आणि यांच्यातूनच सर्वच्य पर्दे हे चुकीच्या लोकांच्या हाती जाऊन एक दिवस पुन्हा लोकशाही असलेल्या देशालाही हे फक्त पैशावर विकत घेऊन निवडून येणारे नेते नक्कीच एक दिवस आपला देश विकायला काढून पुन्हा आपला देश पारतंत्र्यात ढकलून देतील
राजा आता तरी जागा हो
पेरे पाटलांची मुलगी पडली ही बातमी खूप व्हायरल झाली.पण लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या एकाही चायनल वाल्याने,खऱ्या अर्थाने पेरे पाटलांची मुलगी किंवा पेरे पाटील नाही हारले,तर खऱ्या अर्थाने लोकशाही हारली अशा आशयाचे हेडलाईन कुठेच चॅनलवर पहायला मिळाले नाही.किंवा कुठेच सोशल मीडियावर संदेश, किंवा पोस्ट पहायला मिळाली नाही. असो ,पेरे पाटलांची मुलगी नाही हारली,हारली ती आपली लोकशाही.हारला तो मतदारसंघातील प्रत्त्येक मतदार ज्याने पैसे घेऊन मतदान केले.पैशाच्या हव्यासापोटी,पैसे घेऊन अमूल्य असे मतदान विकणारा मतदार व पैशासाठी पैसे घेऊन आपला देह विकणाऱ्या मधे आणि मत विकलेल्या मतदारात काय फरक आहे?
निवडणूका होणे लोकशाहीसाठी गरजेचं आहे . परंतु त्या निकोप अन् पारदर्शा व्हाव्यात , वर्षानुवर्षे तेथे बिनविरोध निवडणूक होत असे त्या राळेगण सिद्धी अन् हिवरेबाजार मध्ये झालेली निवडणूक .. हे यावेळचं विशेष .. मतदारांत त्या मुळे नक्कीच परिवर्तन होऊन येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत कुठल्याही पक्षा कडून,कुठल्याही नेत्यांकडून,कुठल्याही उमेद्वारा कडून पैसे न घेता जो आपल्या गावाचा,शहराचा,तालुक्याचा,जिल्ह्याचा व पर्यायाने देशाचा हिताचा व विकासाचा विचार करेल त्यालाच आपले अमूल्य मत देऊन खऱ्या अर्थाने पुन्हा लोकशाहीला बळकटी मिळण्याची आशा करूयात ...
0 टिप्पण्या