Ticker

6/Breaking/ticker-posts

भाजपचे हे नेते आण्णा हजारेंच्या भेटीला !


 



अहमदनगर :्समाजसेवक आण्‍णा हजारे यांनी कृषि क्षेत्राशी संबधित केलेल्‍या मागण्‍यांबाबत विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली सकारात्‍मक मार्ग काढण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न सुरु झाले आहेत. त्‍यादृष्‍टीने काल झालेल्‍या चर्चेत आण्‍णांनी केलेल्‍या सुचना केंद्रीय नेतृत्‍वाकडे पोहचविण्‍याची ग्‍वाही भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

कृषि क्षेत्राशी संबधित प्रश्‍नांसदर्भात समाजसेवक आण्‍णा हजारे यानी दिल्‍लीमध्‍ये उपोषण करण्‍याचा इशारा दिला आहे. या पार्श्‍वभूमिवर भारतीय जनता पक्षाच्‍या वतीने आ.विखे पाटील यांना आण्‍णा हजारे यांच्‍याशी चर्चा करण्‍यासाठी पाठविण्‍यात आले होते.

राळेगण येथे आण्‍णा हजारे आणि आ.विखे पाटील यांची भेट होवून तब्‍बल दोन तास चर्चा झाली. यामध्‍ये प्रामुख्‍याने केंद्र सरकारने केलेले कृषि कायदे, स्‍वामीनाथन आयोग, कृषिमुल्‍य आयोगाला स्‍वतंत्र दर्जा या विषयांवर मुद्देसुद चर्चा झाली.या चर्चे दरम्‍याने आ.विखे पाटील यांनी आण्‍णा हजारे यांचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्‍याशी दुरध्‍वनीवरुन बोलणेही करुन दिले.कृषि क्षेत्राशी संबधित त्‍यांनी केलेल्‍या सर्वच सुचना या केंद्रीय नेतृत्‍वापर्यंत आम्‍ही पोह‍चविणार आहोत. या चर्चेतूनच यशस्‍वी मार्ग निश्चित निघेल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला. त्यामुळे अण्णा आणि केंद्र सरकार यांच्यात समन्वय घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू असून भेटी - गाठी अन् हालचाली गतिमान झाल्या आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या