अहमदनगर : पुरोगामी विचारांच्या,विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन असणा-या शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने ‘विळखा’, ‘सुनदी’, ‘जीवन संघर्ष’, ‘विजेता’, ‘अबोल अश्रू’ सह आकरा पुस्तकांना २०१९ चे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार जाहिर करण्यात येत आहेत अशी माहिती शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.
नवोदित लेखक,कवींना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी कथाकथन,काव्यवाचन, परिसंवाद,चर्चासत्र,कथा-काव्य लेखन स्पर्धा,विविध पुरस्कार,पुस्तक प्रकाशन,बालसंस्कार शिबीर ई उपक्रम राबविण्यात येतात.त्यानंतर वर्षातून एकदा सर्व सभासदांना एकत्र भेटता यावे यासाठी राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते.त्याचाच एक भाग म्हणून “राज्यस्तरीय वाड्मय स्पर्धा” आयोजित करण्यात येतात.कविवर्य चंद्रकांत पालवे,प्रा.शर्मिला गोसावी,सुभाष सोनवणे,श्याम शिंदे,प्रा.डॉ.अशोक कानडे,भाऊसाहेब सावंत, प्रा.मारुती सावंत यांनी परीक्षक म्हणून यावर्षी काम पाहिले.त्यानुसार
२०१९ चे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार ” पुढीलप्रमाणे
कादंबरी – विळखा, दशरथ चौरे,अहमदनगर,
काव्यसंग्रह – सुनादी, मांगीलाल राठोड,बुलढाणा
गझलसंग्रह - हे बंध रेशमाचे,बबन धुमाळ,दौंड,
कथासंग्रह - अबोल अश्रू,प्रा.डॉ.गिरीश खारकर, अमरावती, लेखसंग्रह - कृतार्थता,डॉ.अशोक ढगे,नेवासा,
आत्मचरित्र - जीवन संघर्ष,भानुदास आहेर, सावेडी,
समिक्षाग्रंथ - उलगडलेल्या नव्या उजेडवाटा,एकनाथ खिल्लारे,औरंगाबाद,
संकीर्ण - कुंकू ते दुनियादारी,प्रा.डॉ.राजेंद्र थोरात,पुणे,
बाल कथासंग्रह – विजेता,उमेश घेवरीकर,शेवगांव, बाल काव्यसंग्रह – काव्यश्रुती,कु.श्रुती गालफाडे,लातूर व आभाळ माया,कु.अस्मिता मराठे,लाड जळगाव
या पुस्तकांचा पुरस्कारामध्ये समावेश आहे.स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र,शाल,बुके व साहित्य संमेलनात सहभाग असे पुरस्काराचे स्वरूप असून पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलना मध्ये पुरस्कार वितरण होणार आहे.
पुरस्कार विजेत्यांचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, खजिनदार भगवान राऊत,भाऊसाहेब सावंत,डॉ.राधाकृष्ण जोशी,अजयकुमार पवार,किशोर डोंगरे,बबनराव गिरी,भारत गाडेकर, ज्ञानदेव पांडूळे,विनायक पवळे,राजेंद्र फंड यांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या